शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; सरकारकडून मागितलं उत्तर
2
माझा आजचा दौरा जड अंतःकरणाने रद्द करावा लागतो आहे; कारण सांगत धनंजय मुंडेंनी दिली माहिती
3
२०३२ पर्यंत गुरुची अतिचारी गती: ९ राशींना गुरुबळ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; बक्कळ लाभ, भरभराट!
4
Brahmos Deal with Vietnam : 'ब्रह्मोस' भारताला आणखी मालामाल करणार, हा छोटासा देश चीनशी टक्कर घेणार; होणार 700 मिलियन डॉलरची डील!
5
"तुम मराठी लोग गंदा है...", घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी-गुजराती वाद, मनसैनिकांनी काय केलं पाहा...
6
सोन्याच्या दरात मोठी तेजी, पोहोचलं १ लाखांच्या जवळ, किंमत कमी होण्याची शक्यता आहे का? पाहा नवे दर
7
लोणावळा रेल्वे रुळाजवळ सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ!
8
IPL 2025: २५ दिवसांपूर्वी केलेली भविष्यवाणी आज काव्या मारनला हसवणार की रडवणार? प्रकरण काय
9
"एकनाथ शिंदेंच्या घरात शूटिंग केलं तेव्हा.."; क्षितीश दातेने सांगितला 'धर्मवीर'चा अनुभव
10
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा कुबेर महाराजांची तसबीर आणि 'या' पाच भाग्यदायी वस्तू!
11
"स्क्रीनवर चांगली दिसण्यासाठी ती...", श्रीदेवीच्या मृत्यूबाबतीत बोनी कपूर यांचा धक्कादायक खुलासा
12
Dia Mirza : "तो सीन करताना मी थरथरत होती, मला उलटी झाली"; दीया मिर्झाने सांगितला शुटिंगचा अनुभव
13
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले दीड कोटी! आता बोनस शेअर्स आणि लाभांशाची लागणार लॉटरी
14
भारतासमोर चीन गुडघ्यांवर, ड्रॅगन सर्व अटी मानण्यास तयार; नक्की काय आहे प्रकरण?
15
जून आणि ऑगस्टमध्ये रेपो दरात पुन्हा RBI कपात करणार का? लोन होऊ शकतात आणखी स्वस्त
16
लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका अन् सीडीएससीओने ‘त्या’ ३५ औषधांवर घातली बंदी
17
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शनी देणार 'या' पाच राशींना अक्षय्य धनलाभ आणि कीर्ती!
18
"...म्हणून जाती धर्माचे मुद्दे पुढे केले जात आहेत का?", जयंत पाटलांचा महायुती सरकारला सवाल
19
ट्रम्प टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेची रिझर्व्ह बँकही चिंतेत; अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्यक्त केली मोठी भीती
20
कामाच्या वेळी पायावर पाय ठेवला तरी शिक्षा, मुंबईच्या तरुणाचा भयंकर अनुभव, 60 जणांची सुटका

महाराष्ट्रात पोलिस भरतीत आदिवासी उमेदवारांना ५ सेंमीची सूट, गृह विभागाकडून अधिसूचना जारी

By जितेंद्र दखने | Updated: October 6, 2024 17:34 IST

पोलिस बनण्याची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा

अमरावती : राज्य सरकारने पोलिस भरतीत आदिवासी उमेदवारांना ५ सेंमीची सूट दिली आहे. ही अनुसूचित जमातीसाठी विशेष तरतूद आहे. यामुळे पोलिस भरतीत आदिवासी तरुण-तरुणींना आता मोठा लाभ होणार होणार आहे.

राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या उमेदवारांना शारीरिक पात्रतेमधील विहित केलेल्या उंचीमध्ये ५ सेंटिमीटरची शिथिलता देण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गत काही दिवसांपूर्वी केळापूर-आर्णीचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी निवेदन देऊन विनंती केली होती. त्याअनुषंगाने राज्य शासनाने आदिवासी उमेदवारांना पाच सेंटिमीटरची सूट देण्याबाबत शुक्रवार, ४ ऑक्टोबर रोजी राजपत्र जारी केले असून त्यावर शासनाचे उपसचिव द. ह. कदम यांची स्वाक्षरी आहे.

महाराष्ट्र पोलिस अधिनियम (१९५१चा २२) याच्या कलम ५ च्या खंड (ब) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासनाद्वारे महाराष्ट्र पोलिस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ यात आणखी सुधारणा करण्यात आली आहे. या नियमास महाराष्ट्र पोलिस शिपाई सेवाप्रवेश (सुधारणा) नियम, २०२४ संबोधले जाणार आहे. जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्तींची पूर्तता करतात, अशा अनुसूचित जमातीतील उमेदवारांना आवश्यक असलेल्या उंचीमध्ये ५ सेंटिमीटर इतकी शिथिलता यापुढे पोलिस भरतीत देण्यात येणार आहे.केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने भारतीय पोलिस सेवा, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स व अन्य सेवेत शारीरिक क्षमता चाचणीमध्ये आदिवासींना ५ सेंमीची सूट आहे; पण राज्यात ही सूट नव्हती. आता या निर्णयामुळे आदिवासी उमेदवारांना खूप मोठा लाभ होणार आहे. राज्य शासनाने न्यायिक मागणी पूर्ण केली.-डॉ. संदीप धुर्वे, आमदार, केळापूर-आर्णी मतदारसंघ

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस