शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

चिमुकले आसना, अलमास आई, वडील, आजीविना पोरके! बाभळीच्या टाटानगरवर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 11:01 AM

यमरूपी ट्रकने घेतले पाच बळी

अनंतर बोबडे/ सचिन मानकर

अमरावती : अंजनगाव दर्यापूर म्हणजे दोन्ही शहरवासीयांचे घरअंगणच. अवघ्या ३० किलोमीटरवर असलेल्या अंजनगावातून शेख अझहर हे आई, पत्नी, बहीण, मुलांसह घराच्या ओढीने निघाले. रात्री १०च्या सुमारास त्यांना प्रवासी वाहन न मिळाल्याने व रात्र अधिक होऊ लागल्याने ते अन्य १२ जणांसह मालवाहू वाहनाने दर्यापूरकडे निघाले. इटकीपर्यंतचा प्रवासदेखील झाला. अवघ्या सात ते आठ किलोमीटरवर दर्यापूर राहिले. मात्र हाय रे दैवा, यमरूपात आलेल्या ट्रकने त्यांच्या मालवाहू वाहनास मागून जोरदार धडक दिली अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले. शेख अझहरसह त्यांची आई, पत्नी, मुलगी व पुतण्या अपघातात ठार झाले. शेख अझहर यांची आसना (७) व अलमास (२) ही दोन्ही चिमुकले आई, वडील, बहीण व आजींविना पोरके झाले.

टाटानगर बाभळी येथील शेख एजाज शेख अब्बास (७५) हे कुटुंबीयांसमवेत मुलीच्या दिराच्या लग्नाचा वलिमा आटोपून दर्यापूरकडे परत येत असताना दर्यापूरकडेच जाणारा ट्रक त्यांच्यासाठी ठरला. शेख एजाजदेखील या अपघातात जखमी झाले. शेख एजाज हे मुलगी नफिसा परवीन शेख अनवर (५४) यांच्याकडे राहत होते. ते मुलगी नफिसा, नातू शेख अझहर, नातसून व अन्य कौटुंबिक सदस्यांसोबत सोमवारी पहाटे दर्यापूरहून अंजनगाव सुर्जीला पोहोचले होते. दरम्यान, मंगळवारी आई, वडील, बहीण व आजीचा मृतदेह पाहून सात वर्षांची आसना दिङमूढ झाली. तिला अब्बा, अम्मी, नानी बोलत नाहीत, एवढेच कळत होते; तर दोनवर्षीय शेख अलमास शेख अझहर हा त्याच्या जवळच्या आप्तांना बिलगला होता.

सामाजिक कार्यकर्ते धावले

घटनेची माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल अरबट, हेमंत उमाळे, निखिल अरबट, अतुल सगणे, नंदू अरबट, सचिन शेलारे, आकाश नारोळकर, शरद गावंडे, राहुल भुंबर, वाहतूक शाखा निरीक्षक गोपाल उंबरकर व खल्लारचे ठाणेदार किरण औटे हे घटनास्थळी पोहोचले. रुग्णालयात एकच गर्दी झाल्याने रुग्णांवर उपचार करण्याकरिता डॉक्टरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. रुग्णालयात पोलिसांचा कुठलाही बंदोबस्त तैनात करण्यात आला नव्हता.

धान्य मार्केट बंद

शेख अजहर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करीत असल्याने त्यांना श्रद्धांजलीपर दर्यापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे धान्य मार्केटसुद्धा मंगळवारी बंद ठेवण्यात आले होते.

घराजवळ महिलांचा आक्रोश

दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात पाच मृतदेहांची उत्तरीय तपासणी केल्यानंतर त्यांचे पार्थिव दुपारनंतर टाटानगरमध्ये पोहोचले. ते पाहताच महिला तथा नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. त्या हृदयभेदी आक्रोशाने उपस्थितांचे डोळेदेखील पाणावले. संपूर्ण कुटुंब अपघातबळी ठरल्याची मोठी हळहळ व्यक्त करण्यात आली.

पाचही जणांची अंत्ययात्रा सोबतच

पती, पत्नी, मुलगी, आई व चिमुकला पुतण्या अशा पाचही जणांची अंत्ययात्रा टाटानगर बाभळी येथून मंगळवारी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास निघाली. अंत्ययात्रेत हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. दुपारी चारच्या सुमारास दफनविधी पार पडला.

टॅग्स :AccidentअपघातAmravatiअमरावती