अमरावती : जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुस्थितीत पार पाडण्यासाठी ५ हजार ७३७ पोलीस तैनात राहणार आहेत. पोलीस आयुक्त व ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात जिल्हाभरात पोलीस कर्मचारी दिवसरात्र निवडणूक प्रक्रियेत तैनात राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात मतदान केंद्र तसेच बाहेरील परिसरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील १० पोलीस ठाण्यांतर्गत अमरावती मतदारसंघात २६६, बडनेऱ्यात २९६, तिवसा ९७ व धामणगाव रेल्वे मतदारसंघातील ४ मतदान केंद्रांवर शहर आयुक्तालयातील पोलीस तैनात राहणार आहेत. तसेच मोर्शी, धामणगाव, मेळघाट, दर्यापूर, तिवसा व अचलपूर येथील मतदान केंद्रांवर पोलीस तैनात राहणार आहेत. त्याकरिता जिल्हाभरात ५ हजार ७३७ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. निवडणूक निमित्ताने होत असलेली मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासन आवश्यक उपाययोजना केल्या आहे. पोलीस आयुक्तालय हद्दीत १८५५ कर्मचारी तैनातपोलीस आयुक्त सुरेश मेकला यांच्या मार्गदर्शनात शहरातील मतदान प्रक्रियेकरिता २ पोलीस उपायुक्त, ४ सहायक पोलीस आयुक्त, २७ पोलीस निरीक्षक, ९७ पोलीस उपनिरीक्षक व एपीआय, ११५१ पोलीस कर्मचारी या व्यतिरिक्त ३०० होमगार्ड निवडणूक प्रक्रियेत बंदोबस्तात राहणार आहेत. मतदान यंत्राच्या सुरक्षेकरिता सीपीएमएफच्या तीन तुक ड्या ज्यामध्ये प्रत्येकी १०० जवानांचा सहभाग राहणार आहे. तसेच नाशिक येथून आलेले ५ पुरुष व ५ महिला पीएसआय यांच्याकडे सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
५ हजार ७३७ पोलीस तैनात
By admin | Published: October 14, 2014 11:11 PM