अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्न २७ अभियांत्रिकी महाविद्यालयांत गत दोन दिवसांत अभियांत्रिकी व तांत्रिकी अभ्यासक्रमांचे ५० पेपर आटोपले आहेत. गुरुवारी ४८ पेपर होणार असल्याची माहिती आहे. हिवाळी २०२० अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या या परीक्षा होत आहेत.
२२ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचा परीक्षा होत आहे. २२ व २३ मार्च असे दोन दिवसांत ५० पेपर आटाेपले आहेत. एकंदरीत अभियांत्रिकी व तांत्रिकी अभ्यासक्रमांचे २०० पेपर घेण्याचे नियोजन आहे. यापूर्वी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे. परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पेपर पाठविण्यात आले आहे. ‘प्रिंटर टू सेंटर’ प्रणालीनुसार विद्यापीठाने ऑनलाईन पेपर पाठविले जात आहे. पुढील आठवड्यात अभियांत्रिकी पेपरचे मूल्यांकन सुरू होईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी दिली.
------------------
ना. उदय सामंत यांनी परीक्षांचा घेतला आढावा
राज्याचे उच्च, तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी अकृषि विद्यापीठाचे कुलगुरू, परीक्षा नियंत्रक आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक आदींकडून हिवाळी २०२०, उन्हाळी २०२१ या परीक्षांचा आढावा घेतला. यावेळी ना. सामंत यांनी विद्यापीठ, महाविद्यायलीन परीक्षेच्या तयारीबाबत माहिती जाणून घेतली. ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारच्या परीक्षांना प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले. कोरोना नियमावलींचे पालन करण्याबाबत त्यांनी अवगत केले.