१९ दिवसांची आकडेवारी : कौटुंबिक कलह देखील अंशत: शमले वैभव बाबरेकर अमरावतीहायवेपासून ५०० मीटर अंतरावरील दारू दुकाने बंद करण्याचा निर्णय झाल्याने दारूविक्रीवर अंकुश आला आहे. हायवेवर दारू सहजासहजी उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातील ५० टक्के अपघात घटल्याचे सुखद चित्र दिसून येत आहे. "लोकमत" ने १९ दिवसांतील अपघातांची माहिती घेतली असता ही बाब समोर आली आहे. याबाबीला इर्विन रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, पोलीस व रुग्णवाहिका चालकांनीही दुजोरा दिला आहे, हे विशेष. दारुबंदीच्या निर्णयाचे अमरावतीकरांनी स्वागत केले आहे. महिलांनी तर हा निर्णय डोक्यावर घेतलाय. जिल्ह्यात कुठेही अपघात घडल्यास जखमी व मृतांना प्रथम इर्विन रुग्णालयात आणले जाते. अपघाताविषयी गुन्हे दाखल होत असल्यामुळे पोलिसांकडून सर्वप्रथम जखमी व मृतांची नोंद इर्विन रुग्णालयातील पोलीस चौकीत केली जाते. या नोंदीनुसार दारुबंदीनंतरच्या १ ते १९ एप्रिल या कालखंडात अपघाताच्या २० घटना घडल्या असून यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला. तुलनेत दारुबंदीपूर्वीच्या १९ दिवसांत तब्बल ३६ अपघात घडले असून त्यामध्ये ५ जण ठार झाले आहेत. दारूबंदीपूर्वी सर्वाधिक अपघात मद्य प्राशन करून वाहन चालविल्यामुळे झाल्याचे इर्विनच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. दारुबंदीनंतरचे बहुतांश अपघात हे वाहनचालकांच्या चुकांमुळे झाल्याचे दिसून आले आहे. दारुबंदीपूर्वी जिल्ह्यात कुठेही सहजरित्या दारुमिळत होती.शहर अपघातविरहित होणार का ?अमरावती : त्यामुळे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्यांची संख्या अधिक होती. मद्यधुंद चालकांमुळे वाहन अनियंत्रित होऊन अपघात घडत होते. दारुबंदीनंतर आता मद्यपींना सहजरित्या दारु मिळत नसल्याने प्रवास सुखकर होतो. दारूसाठी आटापिटा करणे बरेच लोक टाळतात. शिवाय अवैध दारु खरेदी करताना दामदुप्पट पैसे मोजावे लागत असल्याने दारू पिण्यावर आपसुकच निर्बंध आले आहेत. आधी बारमध्ये मित्रांसोबत गप्पा करीत दारू पिण्याचा ट्रेंड होता. त्यामुळे अतिमद्यप्राशन केलेल्या अवस्थेत बारमधून बाहेर पडणे आणि बेभान वाहन चालवित घरी जाणे, हे प्रकार पूर्वी अधिक प्रमाणात होत असत. मात्र, आता बारमध्ये बसून मद्य पिणे सोपे राहिलेले नाही. त्यामुळेच मद्यपी शुद्धीवर राहूनच घरी पोहोचत आहेत. परिणामी अपघातही कमी झाले आहेत. हिच स्थिती कायम राहिल्यास अमरावती शहर अपघातविरहित होण्यास वेळ लागणार नाही, अशा प्रतिक्रिया जनसामान्यांमध्ये उमटत आहेत. (प्रतिनिधी)वाहतूक शाखेचाही दुजोराशहरातील अनियंत्रीत वाहतूक सुरळीत करण्याचे सातत्याने प्रयत्न करणाऱ्या वाहतूक शाखेला दारुबंदीनंतर थोडा दिलासा मिळाला आहे. दारुबंदीपूर्वी मद्यधुंद वाहनचालकांचे प्रमाण अधिक होते. मात्र, तुलनेत आता मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. पूर्वी ‘ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह’च्या कारवाई दररोज होत असत. मात्र, आता कारवाई नगण्य आहेत. अपघातांचे प्रमाण घटल्याचेही सहायक पोलीस आयुक्त डोंगरदिवे यांनी सांगितले. मद्यपींची वर्दळ कमीदारूबंदीपूर्वी चिल्लर दारूविक्रीच्या दुकानांमध्ये वारंवार जाऊन दारू पिणाऱ्यांची संख्या अधिक होती. मात्र, आता बहुतांश दुकाने बंद झाल्यामुळे पाचशे मीटर लांबवर दारु पिण्यासाठी जाणे बहुतांश मद्यपी टाळत आहेत. त्यामुळे शहरातून मद्यपींची वर्दळ सुद्धा कमी झाली आहे. पूर्वी दारू दुकानांच्या आसपास मद्यपींची गर्दी दिसत असे, आता ती ओसरली आहे. संसारही झाले सुरळीतदारुमुळे अनेकांचे संसार उद्घस्त झाले आहेत. पूर्वी दारू पिऊन उशिरा घरी येणारे आणि मारझोड करणारे नवरे आता शांत झाल्याने कित्येक महिलांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे दारूबंदीच्या निर्णयाचे स्वागतच होत आहे.
जिल्ह्यात दारुबंदीनंतर अपघातात ५० टक्के घट
By admin | Published: April 20, 2017 12:04 AM