मोहन राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : वाढत्या थंडीमुळे शेळ्या, गार्इंसह इतर जनावरे विविध आजाराने ग्रस्त असताना धामणगाव शहरातील सर्वात मोठा असलेला पशुवैद्यकीय दवाखाना मागील आठ दिवसांपासून अधिकाऱ्यांअभावी बंद आहे. दरम्यान, तालुक्यातील पशुधन विकास अधिकाऱ्यांची चार पदे रिक्त असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे पन्नास हजारांवर पशुधन धोक्यात आले आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पाहायला मिळत आहे.धामणगाव तालुक्यातील राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या सर्वात मोठ्या शहरातील पशुवैद्यकीय दवाखाना कर्मचाऱ्यांअभावी ओस पडला आहे. येथे नियुक्त असलेले पशुधन विकास अधिकारी तेलंग यांना सोयीचे म्हणून अमरावती येथे प्रतिनियुक्तीवर देण्यात आले, तर धारणी येथील एका महिला अधिकाºयाची प्रतिनियुक्ती धामणगावातील दवाखान्यात करण्यात आली होती. मात्र, त्या प्रसूती रजेवर असल्याने येथील पशुवैद्यकीय दवाखाना आठ दिवसापासून बंद आहे. शेंदूरजना खुर्द येथे अनेक दिवसांपासून परिचराचे पद रिक्त आहे. हीच अवस्था हिरपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची आहे. जिल्हा परिषद अंतर्गत तळेगाव दशासर येथील दवाखान्यात चार महिन्यांपूर्वी बदली झालेले पशुधन विकास अधिकारी रुजू होण्यास तयार नाहीत. मंगरूळ दस्तगीर येथील पशुधन विकास अधिकारी व परिचराचे पद रिक्त आहे.औषधांचा तुटवडासध्या थंडीचे दिवस असल्याने शेळ्यांना सर्दी व हगवण या आजाराने ग्रासले आहे. मात्र, तालुक्यात या दोन्ही आजारावर औषध उपलब्ध नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जनावरांसाठी पोषक टॉनिक नाही. एखादा पशू जखमी झाल्यास अँटिसेप्टिक मलम नाही. तोंडखुरीकरिता लसीकरण करण्यात येते; मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे हे लसीकरण कितपत पूर्ण केले जाते, असाही प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.विरूळ रोंघेचा प्रस्ताव धूळखातधामणगाव ते चांदूर रेल्वे अशा २१ किलोमीटरच्या अंतरात एकही पशुवैद्यकीय दवाखाना नाही. या दोन तालुक्यांच्या मध्यभागी असलेल्या विरुळ रोंघे येथे पशुवैद्यकीय दवाखाना व्हावा म्हणून दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. पाच हजार पशुधन घटक असलेल्या परिसरात पशुवैद्यकीय दवाखान्याच्या महत्त्वाच्या प्रस्तावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. येथील शेतकऱ्यांना आपली जनावरे उपचारासाठी चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे अशा तालुक्याच्या ठिकाणी आणावे लागतात.कधी मिळणार पशुधन विकास अधिकारी?धामणगाव पंचायत समिती निर्मितीच्या वेळी आकृतिबंधात पशुधन विकास अधिकारी या पदाला मंजुरी देण्यात आली नाही. तेव्हापासून हे पद नसल्याने अनेक योजना पशुसंवर्धन विभागाला राबविता आलेल्या नाहीत. मंत्रालयातून हे पद आकृतिबंधात मंजूर करण्यासाठी आतापर्यंत कोणताच प्रयत्न झाला नसल्याचे पाहायला मिळत आहे. शासनाच्या अनेक योजनांचा डोलारा प्रभारी अधिकाºयाला सांभाळावा लागत आहेधामणगाव तालुक्यातील पशुधन विकास अधिकाऱ्यांची काही पदे रिक्त आहे प्रतिनियुक्तीवर काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.- विजय रहाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, अमरावती
५० हजार पशुधन धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 10:26 PM
मोहन राऊत। लोकमत न्यूज नेटवर्क धामणगाव रेल्वे : वाढत्या थंडीमुळे शेळ्या, गार्इंसह इतर जनावरे विविध आजाराने ग्रस्त असताना धामणगाव ...
ठळक मुद्देडॉक्टरविना दवाखाना आठ दिवसांपासून बंद : पशुधन विकास अधिकाऱ्यांची चार पदे रिक्त