‘आरटीओ’ची आकडेवारी : एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत नोंदणीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्याची लोकसंख्या २९ लाख आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्यांवर झालेली वाहनांची गर्दी लक्ष वेधून घेणारी आहे. वाहनांची वाढती संख्या ल्क्षात घेता पार्किंगचा मात्र पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत ५० हजार दुचाकींची नोंदणी होऊन त्या रस्त्यावर आल्या आहेत. वर्षानुवर्षे चारचाकी आणि दुचाकींच्या वाढत्या संख्येमुळे प्रदूषण पातळीचा आलेख वाढतच चालला असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहनांच्या नोंदीनुसार यंदा ३२१६५ मोटरसायकल, ९२१२ स्कुटर्स, २७१ मोपडची नोंदणी करण्यात आली. मोटर कार ३६८२, जीप गाडी १३७, ट्रॅक्टर्स ६०, स्टेज कॅरेज वाहन २५, आॅटोरिक्षा ५०३, मिनीबस २७, स्कूल बस १३१, अॅम्बुलन्स ११, ट्रक आणि लॉरिज २०९, टँकर १, व्हॅन ५२०, व्हॅन थ्री व्हिलर २७१, ट्रॅक्टर्स ७९६, ट्रेलर्स ३७३ तर अन्य ४१ वाहनांची नोंदणी झाली आहे. मागिल काही वर्षांची आकडेवारी लक्षात घेता दरवर्षी वाहन नोंदणीत वाढ होत आहे. रस्त्यावरील दुचाकी व चारचाकीच्या गर्दीमुळे आरोग्यावर दुष्परिणाम संभवतात. फफ्फुसाचे रोग, श्वसनाचे आजार, रक्तदाबाने बाधित रूग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. कार्बनडाय आॅक्साईड, मोनॉक्साईडचे प्रदूषण वाढत असल्याचा अहवाल प्रदूषण विभागाने शासनाकडे सादर केल्याची माहिती एका डॉक्टरने दिली..दुचाकींची महिनानिहाय नोंदणी १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या वर्षभरात ५० हजार दुचाकी रस्त्यावर आल्यात आहेत. तत्पूर्वी या दुचाकींची रितसर नोंदणी आरटीओमध्ये करण्यात आली आहे. एप्रिल२०१६ मध्ये- ३८०२, मे- २९०५, जून २९०५, जून-३१८२, जुलै-३६३९, आॅगस्ट- ३०३९, सप्टेंबर- ३५१३, आॅक्टोंबर- ५४७१, नोव्हेंबर- ४३१३, डिसेंबर-१९९७ तर जानेवारी २०१७ मध्ये-३९२, फेब्रुवारी-३०१, मार्च-४७४ मध्ये दुचाकींची नोदणी करण्यात आली आहे.अन्य वाहनांच्या तुलनेत दुचाकींची सर्वाधिक नोंदणी झाली आहे.. गतवर्षीपेक्षा ही आकडेवारी जास्त आहे. तरुणाईचा कल दुचाकीकडे असल्याचे नोंदणीवरुन दिसून येते.- विजय काठोडेप्रादेशिक परिवहन अधिकारी
वर्षभरात ५० हजार दुचाकी रस्त्यावर
By admin | Published: May 26, 2017 1:33 AM