अनिल कडू
परतवाडा (अमरावती) : अचलपूर तालुक्यातील पथ्रोट पोलीस स्टेशन अंतर्गत ५० वर्षीय एका असहाय्य महिलेवर बलात्कार करून खून ३० वर्षीय युवकाने तिचा खून केल्याची खळबळजनक घटना पथ्रोट येथे उघडकीस आली आहे. शुक्रवारला दुपारी चार वाजताच्यादरम्यान घडलेली ही घटना रात्री साडे आठ वाजता उजेडात आली.
यात आरोपी विशाल तांबटकर (३०) रा.पथ्रोट यास पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास पथ्रोट पोलीस करीत आहेत.