अमरावती : अनुशेषांतर्गत होत असलेल्या १७ प्रकल्पांमध्ये एकूण ८३ गावठाणे बाधित झाले. यापैकी ५४ गावठाणांची जमीन संपादनाची कामे अद्याप अपूर्ण आहे. सदर कामे जलसंपदा विभाग केव्हा पूर्ण करणार, असा सवाल केला जात आहे.धरणाच्या बाधित क्षेत्रातील जमिनी भूसंपादनात २८ गावांचा समावेश आहे. येथे नवीन प्रस्तावित गावठाणांची संख्या ६८ आहे. यापैकी ३ गावांतील गावठाणांची कामे ९५ टक्के पूर्ण झाली आहे. बिगर अनुशेषअंतर्गत ८ प्रकल्प असून यामध्ये ३० गावठाणांच्या जमिनी संपादन प्रक्रिया पूर्ण झाली असून, अद्यापही ११० गावांच्या गावठाणांचा प्रश्न प्रलंबित आहे. १३४ नवीन गावठाणांचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठविला असून सदर कामे तातडीने पूर्ण करावी, अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. जी गावे बाधित क्षेत्रात आहेत त्या गावांचे पुनर्वसन करण्यात झाल्याची माहिती संबंधित अभियंत्यांनी दिली.गर्गा मध्यम प्रकल्पांत एक गाव बाधित क्षेत्रातगर्गा मध्यम प्रकल्पांतर्गत तातरा हे गाव बाधित क्षेत्रात आहे. २.४७ हेक्टरच्या भूसंपादनाकरिता कलम १९ नुसार कारवाई सुरू आहे. पंढरी मध्यम प्रकल्पात खापरखेडा हे गावठाण येत असून त्याचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. खराड या नवीन गावठाणाचा प्रस्ताव सादर केला आहे.चंद्रभागा बॅरेजमध्ये असदपूर व शहापूर हे गावठाण येत असून यामध्ये ३.४८ हेक्टरचा कलम २१ नुसार संपादन करण्यात येणार आहे. नागरी सुविधांची कामांची निविदा प्रक्रिया राबविणे सुरू आहे. निम्नपेढी अंतर्गत पाच गावे पूर्णता: व दोन गावे अंशत: बाधित क्षेत्रात येतात. यामध्ये पाच गावांचे संपादन करण्यात आले आहे. पेढी बॅरेजचे दोन गावांची कामे अपूर्ण आहेत. निम्न चारगड प्रकल्पांचे दोन गावे पूर्णता: बाधित असून कामे पूर्ण झाल्याचा अहवाल जलसंपदा विभागाने सादर केला आहे. इतर अनेक गावांची कामे प्रलंबित आहेत.वासनी प्रकल्पातील तीन बाधित गावठाण्यांचे संपादन पूर्णवासनी मध्यम प्रकल्पासाठी बोरगाव पेठ, बोरगाव तळणी, बोरगाव दोरी या गावठाणांचे संपादन पूर्ण झाला आहे. ठिकाणच्या नागरी सुविधेच्या कामाकरिता निविदा निश्चित झाली असून कार्यारंभ आदेश देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
१७ प्रकल्पांतील ५४ गावठाण संपादनाची कामे अपूर्णच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 7:25 PM