महापालिका यंत्रणा गपगार : आस्थापना खर्चात वाढ, आयुक्तांनी घेतला आढावाअमरावती : महापालिकेला कंत्राटी तत्त्वावर सेवा देणाऱ्या कामगार कर्मचाऱ्यांवर वर्षाकाठी तब्बल ५.४५ कोटी रुपये खर्च होत असल्याची बाब उघड झाली आहे. ‘ड’ वर्ग महापालिका असलेल्या अमरावती महापालिकेचा आस्थापना खर्च केव्हाचाच ६५ टक्क्यांचावर गेला असताना कंत्राटीच्या मानधनामुळे महापालिकेच्या तिजोरीवर महिन्याकाठी सुमारे ४५.४५ लाख रुपयांचा अतिरिक्त भूर्दंड पडत आहे. संपुष्टात आलेली जकात प्रक्रिया आणि उत्पन्नाच्या मर्यादित स्त्रोतामुळे पालिकेची आर्थिक परिस्थिती फार गंभीर झाली आहे. मालमत्ता कर आणि शासनाकडून मिळणाऱ्या एलबीटीच्या परताव्यावर महापालिकेचा आर्थिक डोलारा विसंबला आहे.सुरक्षा रक्षकांची सर्वाधिक संख्याअमरावती : उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादित असतानाही आस्थापना खर्चात ६५ टक्क्यांच्या वर वाढ झाल्याने नोकर भरतीस बंदी घालण्यात आली आहे. मात्र त्याचवेळी यंत्रणा चालविण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने पालिकेने ‘आऊट सोर्सिंग’चा पर्याय निवडला आहे. स्वास्थ निरीक्षकापासून शिपायांपर्यंत आणि उपलेखाधिकाऱ्यांपासून संगणकचालकांपर्यंत ४५४ कंत्राटींना महापालिका सेवेत मानधनतत्त्वावर घेण्यात आले आहे. या ४५४ कंत्राटी कामगारांना महिन्याकाठी ७ ते १६ हजार असे मानधन दिले जाते. या कंत्राटीमध्ये विविध संवर्गाचे कामगार - कर्मचारी असले तरी यंत्रणेत मात्र अद्यापही प्रशासकीय सुसुत्रता आलेली नाही. महापालिका कर्मचारी कार्यरत असताना शेकडोंच्या संख्येने कंत्राटी कर्मचारी कार्यरत असल्याने प्रशासनात सुसुत्रता येणे अपेक्षित असताना प्रशासनाला लालफितशाहीने घेरले आहे. महापालिकेच्या आस्थापनेवर असलेल्या अधिकारी - कर्मचाऱ्यांचे वेतन दोन-दोन महिने होत नसताना कंत्राटीची संख्या आवश्यकतेपेक्षा वाढवून काही घटकप्रमुखांनीच महापालिकेचे आर्थिक कंबरडे मोडण्यास हातभार लावला आहे.१४६ चा करारनामा असताना जानेवारीअखेर सुरक्षारक्षकांची संख्या १९२ पर्यंत वाढविण्यात आली होती. त्यातील ३७ जण १ फेब्रुवारीला कमी करण्यात आले आहेत. त्यांच्याच मानधनावर महिन्याकाठी सर्वाधिक खर्च केला जातो. दरम्यान आयुक्त हेमंत पवार यांनी शनिवारी कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आढावा घेतला असून मंगळवारी कंत्राटींच्या कपातीवर शिक्कामोर्तब होणार आहे. (प्रतिनिधी)कंत्राटी कर्मचारी स्वास्थ निरीक्षक, शिपाई, बागवान मजुर, राजमिसर््ीं, मिस्त्री हेल्पर, सुरक्षा रक्षक, लिपिक, उपलेखाधिकारी, सहायक अधीक्षक, सर्व्हेअर, सुतार, वेल्डर, वाहन चालक, संगणक चालक ७ ते १६ हजार मानधन १५ पेक्षा अधिक प्रकारच्या कंत्राटी कामगार - कर्मचाऱ्यांना ७ ते सर्वाधिक १६ हजार रुपये मानधन महिन्याकाठी दिली जाते. कार्यशाळा विभागातील ३० कंत्राटी वाहनचालकांना दरमहा प्रत्येकी १६ हजार रुपये मानधन दिले जाते. मजुरांनाही प्रत्येकी १० हजार रुपये, सर्व्हेअर, सुतारांना वेल्डरांना प्रत्येकी १६ हजार रुपये, शिपायांना १० हजार रुपये, सुरक्षा रक्षकाां ८७२६ रुपये तर संगणक चालकांना प्रतिमाह ७ हजार रुपये मानधन दिले जात आहे.
४५४ कंत्राटींवर ५.४५ कोटींचा खर्च
By admin | Published: February 06, 2017 12:04 AM