लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती/बडनेरा : नागपूर-मुंबई हायवे क्रमांक ६ वरील लोणी टाकळीजवळ स्थानिक गुन्हे शाखा व लोणी पोलिसांनी एका ट्रकमधून बुधवारी सकाळी तब्बल ५५ लाखांचा गांजा जप्त केला. विशेष म्हणजे, अंमली पदार्थ विरोधीदिनीच ही कारवाई करण्यात आली. केळीने भरलेल्या ट्रकमधून गांजाची तस्करी केली जात होती. पोलिसांनी ट्रक पकडताच चालक व एका इसमाने तेथून पलायन केले. पोलिसांनी १० क्विटंल गांजा, ट्रक व इतर साहित्य असता एकूण ७२ लाखांचा माल जप्त केला आहे.पोलीस सूत्रानुसार, गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा व लोणी पोलिसांनी नागपूर-मुंबई महामार्ग क्रमांक ६ च्या लोणी टाकळीजवळील साई रिसोर्टसमोर नाकाबंदी केली. पोलिसांनी ट्रक क्रमांक एचआर ४६ सी-१६५७ ला थांबविले. यावेळी ट्रकचालक व सोबत असलेला एक इसम पळून गेला. पोलिसांनी ट्रकमधून समाधान शंकर हिरे (रा. जळगाव) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, ट्रकमधील केळीचा माल आंध्र प्रदेशातून उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे नेला जात असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.पोलिसांनी ट्रकची बारकाईने पाहणी करून ट्रकमधील केळीच्या काही माल बाहेर काढला असता, खालच्या भागात पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या ३५ पोते आढळून आले. त्या पोत्यांची तपासणी केल्यानंतर त्यात तब्बल १० क्विंटल गांजाचा माल असल्याचे दिसले.पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन ट्रकसह गांजाचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्यातील पसार आरोपीच्या शोधात पोलीस पथके रवाना झाली आहेत.केळीच्या आड गांजाची तस्करीपोलीस चौकशीत हा ट्रक पन्नालाल सनउ बासदेव (रा. रोहतक, हरियाणा) याच्या मालकीचा असल्याचे निदर्शनास आले. ट्रकमध्ये गव्हाचा माल भरून चालक हरियाणा येथून आंध्र प्रदेशात गेला होता. त्याच ट्रकमध्ये केळी भरून तो माल वाराणसीला घेऊन जात असताना केळीखाली लपवून ठेवलेल्या गांजाच्या तस्करीचा भंडाफोड झाला.यांनी केली ही धडाकेबाज कारवाईगांजा तस्करीची गोपनीय माहिती मिळताच पोलीस अधीक्षक दिलीप झळके, अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश पालवे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल किनगे, सचिंद्र शिंदे, लोणीचे ठाणेदार एस.एस. अहिरकर, पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी, विशाल हिवरकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक वासुदेव नागलकर, पोलीस हवालदार शकुर शेख, इंगळे, भारत देशकरी, बाबू रंगे, गजानन म्हस्के, प्रकाश किल्लेदार, सुनिल निर्मळ, वीरेंद्र तराळे, दिनेश कनोजिया, भागवत नागरगोजे, मोहन ठाणेकर, अमोल घोडे, चालक एएसआय शिवदास, पोलीस हवालदार अरविंद लोहकरे, नितेश तेलगोटे यांनी लोणी टाकळी हद्दीत सापळा रचून गांजा तस्करीचा पदार्फाश केला.
५५ लाखांचा गांजा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 11:33 PM
नागपूर-मुंबई हायवे क्रमांक ६ वरील लोणी टाकळीजवळ स्थानिक गुन्हे शाखा व लोणी पोलिसांनी एका ट्रकमधून बुधवारी सकाळी तब्बल ५५ लाखांचा गांजा जप्त केला. विशेष म्हणजे, अंमली पदार्थ विरोधीदिनीच ही कारवाई करण्यात आली. केळीने भरलेल्या ट्रकमधून गांजाची तस्करी केली जात होती. पोलिसांनी ट्रक पकडताच चालक व एका इसमाने तेथून पलायन केले. पोलिसांनी १० क्विटंल गांजा, ट्रक व इतर साहित्य असता एकूण ७२ लाखांचा माल जप्त केला आहे.
ठळक मुद्देअमली पदार्थ विरोधीदिनी कारवाई : केळीच्या ट्रकमधून गांजाची वाहतूक