लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कुणी म्हणाले, वाढीव ४० टक्के मालमत्ता कराला तत्कालीन पालकमंत्र्यांनी स्थगिती दिली. तर, कुणी म्हणे, पाचपट नव्हे तर दुप्पटच कर भरावा लागणार, तर कुणी वाढीव कर न भरण्याचे आवाहन केले. चार संघटना न्यायालयात देखील गेल्या. एकंदरीतच वाढीव कर भरावा की कसे, असा प्रश्न अमरावतीकरांसमोर उभा ठाकला. अशा संभ्रमावस्थेतही महापालिकेच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे २.२३ लाख स्थायी मालमत्ताधारकांपैकी 99 हजार मालमत्ताधारकांनी ३८ कोटींचा टॅक्स भरला. त्यामुळे महापालिकेने अधिकाधिक सूट देऊन ७ मेपर्यंत शास्तीविना कर भरण्याचे आवाहन केले आहे.
तब्बल १८ वर्षांनंतर सन २०२२- २३ मध्ये प्रथमच महापालिका क्षेत्रातील मालमत्तांचे सर्वेक्षण व नव्याने करनिर्धारण करण्यात आले. एजंसीने केलेल्या व्यापक सर्वेक्षणामुळे ३२ ते ३५ कोटींवर स्थिरावलेली मालमत्ता कराची मागणी तब्बल १४९ कोटींवर पोहोचली. २.२३ लाख स्थायी मालमत्तांसह खुले भूखंडदेखील कराच्या कक्षेत आले. त्याचवेळी वाढीव कराविरोधात आंदोलनाची राळ उठली. कोर्टबाजीदेखील झाली. त्यात राजकीय श्रेयवाद शिरला. माध्यमांतून निवेदने जाहीर झालीत. त्यामुळे अमरावतीकरांमध्ये संभ्रम निर्माण झाला. कर भरावा की भरू नये, अशी परिस्थिती निर्माण झाली. अनेक बड्यांनी, मोठ्या इमारतधारकांनी, व्यावसायिक इमारतधारकांनी कर भरण्यास कुचराई केली. मात्र २५ ते ३१ मार्च या कालावधीत अगदी वेळेवर कर देयके हाती आल्यानंतरही ५५ हजार सामान्यांनी कर रकमेचा भरणा केला. विशेष म्हणजे महापालिका आस्थापनेसह कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून प्रत्येक मालमत्ताधारकांच्या घरे त्यांचे मालमत्ता देयक त्यांच्यापर्यंत पोहोचले. ३१ मार्चपर्यंत ती वितरित करणे सुरूच होती. त्यामुळे कर वसुलीला ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देऊन सामान्य करात १० टक्के सूट व ऑनलाईन भरणा केल्यास ३ टक्के सूट देण्यात आली. पालिकेला लाभ झाला.
सन २०२४/२५ ची झोननिहाय मागणीझोन एकुण मागणी (रु) आतापर्यंतची वसुली१ ५३,२३,५३,९२६ १२,२९,२८,९३१२ ६१,०७,५८८८४३ ७,३४,४७,७८७३ ४०,६८,७३,१२१ ८,१४,२३,१४१ ४ ३६,६६,७९,७९९ ६,१५,८९,६२०५ २९,२९,८८००४ ३,६८,५४,६१९.५
एकूण २२०, ९६,५३,६९३ ३६,८५,४६,१९०.५
नव्या आर्थिक वर्षाची डिमांड २२० कोटीसन २०२३-२४ मध्ये महानगरातील मालमत्तांचे नव्याने असेसमेंट करण्यात आले. त्यातून ३२ ते ३५ कोटींवर स्थिरावलेली मागणी सुमारे १४९ Tax कोटींवर पोहोचली. मागील आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची मागणी कोटी रुपये कर संकलन करण्यात आले. त्यामुळे मागील आर्थिक वर्षाची थकबाकी धरून सन २०२४-२५ ची डिमांड २२० कोटी रुपये आहे.
२.२३ लाख मालमत्तांची नोंदसन २०२२/२३ मधील सर्वेक्षणानुसार महापालिकेकडे २ लाख २३ हजार ४२३ स्थायी मालमत्ता कराच्या कक्षेत आल्या आहेत. नव्याने करण्यात आलेल्या मालमत्ता सर्वेक्षणात एजन्सीच्या सर्वेक्षकांनी तब्बल ७७ हजार ६८३ खुले भूखंड पहिल्यांदा कराच्या कक्षेत आणले. त्यातून महापालिकेला पहिल्यांदा १३ कोटी १ लाख १४ हजारांहून अधिक रक्कम कर स्वरूपात मिळणार आहे.
मालमत्ता कर हा महापालिकेच्या स्वउत्पन्नाचा मुख्य व मोठा स्रोत आहे. करसंकलनातूनच पुढे शहरातील विकासाची कामे होतील. देयके दिली जातील. त्यामुळे अमरावतीकरांनी मालमत्ता कर भरून महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे.- देविदास पवार, आयुक्त, महापालिका