अमरावती : माहे मे, आॅगस्ट व सप्टेंबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ५० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी २२ एप्रिलला मतदान होणार आहे. या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून आचार संहिता लागू झाली आहे.या निवडणूकीमुळे ग्रामिण भागात राजकीय घडामोडीना वेग येणार आहे. जिल्हयात माहे मे ते आॅगष्ट २०१५ या कालावधीत मुदत संपनाऱ्या ५५२ सार्वत्रिक व ५० ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक २२ एप्रिल रोजी होणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील ५५२, ग्रामपंचायतीची सार्वत्रीक निवडणूकीचा समावेश आहे तसेच ५० ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूका होऊ घातल्या आहेत.या ग्रामपंचायत निवडणूकीसाठी ३० मार्चला नोटीस प्रसिध्द होणार आहे. सार्वजनिक सुटीचे दिवस वगळून ३१ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत नामनिर्देशपत्र स्विकारने, ८ एप्रिलला नामनिर्देश पत्राची छाणनी, १० एप्रिलला दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेणे व त्याच दिवशी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द होणार अहे व २२ एप्रिलला सकाळी ७.३० पासून सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान होणार अहे. २३ एप्रिलला मतमोजणी करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात या ग्रामपंचायत निवडणुकीमुळे गटातटाचे राजकीय घडामोडीना वेग येणार असून वार्ड निहाय उमेदवारांची चाचपणी विविध गावातील ग्रामपंचायतमध्ये वर्चस्व करणाऱ्या पुढाऱ्यांनी सुरू केली आहे.
५५२ ग्रापंचायतीच्या निवडणुकीचा बिगूल वाजला
By admin | Published: March 26, 2015 12:08 AM