शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

१९ कॅमेऱ्यांच्या नजरकैदेत ५५८ उमेदवारांची लेखी परीक्षा

By admin | Published: April 09, 2016 12:02 AM

विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालयात घेण्यात आलेल्या पोलीस भरती प्रक्रियेची लेखी परीक्षा शुक्रवारी शांततेत पार पडली.

पोलीस भरती : 'व्हीएमव्ही'त तगडा बंदोबस्त अमरावती : विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालयात घेण्यात आलेल्या पोलीस भरती प्रक्रियेची लेखी परीक्षा शुक्रवारी शांततेत पार पडली. पहिल्या दिवशी १९ कॅमेऱ्यांच्या नजरकैदेत ५५८ उमेदवारांनी ही लेखी परीक्षा दिली असून परीक्षेदरम्यान ग्रामीण व शहर पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. ग्रामीण पोलीस दलातील भरतीसाठी ४ हजार २४३ अर्ज आले होते. मैदानी चाचणीत १ हजार २२६ उमेदवार उत्तीर्ण झाले. यापैकी ५८१ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्यांची शुक्रवारी विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालयात लेखी परीक्षा दुपारी दुपारी २ ते ३.३० वाजेपर्यंत घेण्यात आली. लेखी परीक्षेसाठी ५५८ उमेदवार उपस्थित होते. यामध्ये ४७८ पुरुष व ८० महिला उमेदवारांचा समावेश होता. प्रत्येक वर्ग खोलीत एक पोलीस अधिकारी, तीन पोलीस कर्मचारी व एक व्हिडीओग्राफर ठेवण्यात आले होते. पुरुष उमेदवारांसाठी वेगळे वर्ग तर मुलींची परीक्षा एकाच हॉलमध्ये घेण्यात आली. इन कॅमेरा लेखी परीक्षापोलीस भरतीत पारदर्शकता यावी या उद्देशाने लेखी परीक्षा इनकॅमेरा घेण्यात आली. परीक्षा केंद्रावर तब्बल १९ व्हिडीओग्राफर तैनात होते.परीक्षार्थींचे आगळे स्वागतग्रामीण पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत सहभागी उमेदवारांचे आगळेवेगळे स्वागत करण्यात आले. परीक्षा केंद्राच्या वर्ग खोलीतील ब्लॅकबोर्डवर परीक्षार्थींचे स्वागत करणारे वाक्य लिहिण्यात आले होते. आजपर्यंतच्या पोलीस भरतीप्रक्रियेत पहिल्यांदाच हा आगळावेगळा प्रकार पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्या संकल्पनेतून पोलीस अधिकाऱ्यांनी केल्याची चर्चा सुरू होती. पोलिसांचा तगडा बंदोबस्त पोलीस पदभरती प्रक्रिया पारदर्शक होण्याच्या उद्देशाने परीक्षा केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. यामध्ये पोलीस अधीक्षक लखमी गौतम, अप्पर पोलीस अधीक्षक मकानदार, डीवायएसपी शिवातारे (अंजनगाव) व अमोल गायकवाड (दर्यापूर) यांच्या नेत्तृत्वात सहा पोलीस निरीक्षक, १५ सहायक पोलीस निरीक्षक, १७ पोलीस उपनिरीक्षक व १२५ पोलीस कर्मचारी परीक्षा केंद्रावर तैनात होते. (प्रतिनिधी)