लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत ३२१ अपघाताच्या घटनांत ५६ जणांचा मृत्यू झाले. २९० नागरिक जखमी झाले आहेत. तसेच या वर्षात सप्टेंबरपर्यंत ३४८ अपघातात ५५ मृत्यमुखी पडले असून, २८३ जखमी झाले होते. देशभरात वाढत्या अपघाताची आकडेवारी पाहता शासनाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक होते. मात्र, त्या तुलनेत उपाययोजना झाल्या नाहीत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अल्पकालीन व दीर्घकालीन उपाय सुचविण्यासाठी रस्ता सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे.चारचाकी वाहनधारकांनी क्षमतेपेक्षा अधिक व्यक्तींची वाहतूक करणे, बेदरकारपणे वाहन चालविणे, नशेत वाहन चालवणे, सीटबेल्ट न वापरणे, वेगमर्यादा न पाळण्यांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. त्याकरिता वाहनांची कसून तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. अनेकदा शेतमाल किंवा कुठलीही साहित्य वाहून नेणाऱ्या बैलगाड्या, मिनीट्रक अथवा ट्रेलर नादुरुस्त झाल्यास रस्त्यावरच सोडून दिले जातात. त्यावर कोणताही दिवा नसल्याने अपघात होतात. याबाबत संबंधितांना सूचना देण्याचे व आवश्यक त्या कारवाईचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. आरोग्य विभागाने स्थानिक आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा व ट्रामाकेअर सेंटरचा आढावा घेऊन शासकीय व खासगी रुग्णवाहिकेचा माहितीकोष करण्याचेही निर्देश देण्यात आले आहे.अनियंत्रित, बेशिस्त वाहतुकीचेही बळीजिल्ह्याभरात बेशिस्त वाहतुकीमुळे अनेक अपघात घडत असल्याचे निदर्शनास आले असून, नियमबाह्य वाहतुकीमुळे बहुतांश बळी जात असल्याचे आढळून आलेत. ही अनियंत्रित व नियमबाह्य वाहतूक सुरळीत करण्यासाठीही उपाययोजना करण्यात आल्या आहेत.३४ ब्लॅकस्पॉटवर गतिरोधकजिल्ह्यातील ३४ ब्लॅक स्पॉटवर गतिरोधक, रंबलिंग स्ट्रीप, धोक्याचा इशारा देणारे बोर्ड उभारण्यात येत आहेत. दुचाकीवर दोनपेक्षा अधिक व्यक्तींनी प्रवास करणे, हेल्मेट न वापरणे, नियमभंग करणे आदी आढळल्यास पोलीस व महामार्ग पोलिसांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.सर्वोच्च न्यायालय आणि रस्ता सुरक्षा समितीच्या निर्देेशानुसार रस्ता सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहे. त्यासाठी विविध विभागांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.- विजय काठोळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी
जिल्ह्यात ५६ जणांचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 10:04 PM
जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत ३२१ अपघाताच्या घटनांत ५६ जणांचा मृत्यू झाले. २९० नागरिक जखमी झाले आहेत. तसेच या वर्षात सप्टेंबरपर्यंत ३४८ अपघातात ५५ मृत्यमुखी पडले असून, २८३ जखमी झाले होते.
ठळक मुद्देवर्षभरात ३२१ अपघात : रस्ता सुरक्षिततेसाठी सुचविल्या उपाययोजना