अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा बिगूल वाजताच सहकार क्षेत्रातील रणधुमाळीला वेग आला. बँकेच्या निवडणुकीसाठी ३१ ऑगस्टपासून नामांकन अर्ज उचलणे व दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. १ सप्टेंबर रोजी पाच जणांनी सात नामांकन अर्ज दाखल केले होते. तिसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी ५० जणांनी नामांकन दाखल झाले. दाखल करणाऱ्यामध्ये अनेक दिग्जांचा समावेश आहे. एकूण २५६ जणांनी अर्जाची उचल केली आहे.
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बहुप्रतीक्षेनंतर निवडणूक होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय नेते कामाला लागले आहेत. आगामी ४ ऑक्टोबर रोजी बँकेच्या २१ संचालकपदांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यानुसार निवडणुकरिता आता शुक्रवार आणि सोमवार असे दोन दिवस नामांकन अर्ज उचल व दाखल करण्यासाठी शिल्लक आहेत. त्यामुळे उमेदवारी दाखल करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे.