शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पदवीधरसाठी ५९.९४ टक्के मतदान

By admin | Published: February 04, 2017 12:02 AM

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवारी जिल्ह्यात ५९.९४ टक्के मतदान झाले.

६ फेब्रुवारीला मतमोजणी : जिल्ह्यात ४५ हजार ९६७ मतदारांनी बजावला हक्क, प्रक्रिया शांततेतअमरावती : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवारी जिल्ह्यात ५९.९४ टक्के मतदान झाले. एकूण ७६ हजार ६८६ मतदारांपैकी ४५ हजार ९६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ३० हजार ८५ पुरूष व १५ हजार ८८२ स्त्री मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली.पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यातील ९१ मतदानकेंद्रांमध्ये सकाळी ८ वाजतापासून मतदानाला सुरूवात झाली. पहिल्या दोन तासांत मतदानाचा टक्का माघारला. सकाळी १० पर्यंत केवळ ७.९६ टक्के मतदान झाले. यामध्ये ४ हजार ५१५ पुरूष व १ हजार ५८६ स्त्री अशा एकूण ६ हजार १०१ मतदारांनी मतदान केले. नंतर मात्र मतदानाचा टक्का वाढला. दुपारी २ वाजेपर्यंत ३७.७६ टक्के मतदान झाले. यामध्ये १९ हजार ४५८ पुरूष व १ हजार ४९६ स्त्री असे एकूण २८ हजार ९५४ मतदारांनी गर्दी केली. अंतिम वेळेपर्यंत ५९.९४ टक्के मतदान झाले. यामध्ये ६४.८४ पुरूष व ५२.४४ टक्के स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदानकेंद्रनिहाय दूरध्वनीवरून मतदानाचीही आकडेवारी घेतली. सायंकाळी मतदान केंद्रावरील पथक येथील विभागीय क्रीडा संकुलातील मतमोजणीस्थळी मतदान साहित्य जमा करण्यास आले असता जिल्हा निवडणूक विभागाद्वारा मतदानाची आकडेवारी घेण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. मोर्शी तालुक्यात एकूण २ हजार ८९७ मतदारांपैकी एक हजार ९२ पुरूष व एक हजार २५ स्त्री असे एकूण एक हजार ९९९ मतदारांनी मतदान केले. ही टक्केवारी ७०.९७ इतकी आहे. चांदूररेल्वे तालुक्यात एक हजार २९१ मतदारापैकी ६५९ पुरूष व ३०७ स्त्री असे एकूण ९६६ मतदारांनी मतदान केले. ही ७४ टक्केवारी आहे. धारणी तालुक्यात ८७९ मतदारांपैकी ५१४ पुरूष व १०२ स्त्री अशा एकूण ६१६ मतदारांनी हक्क बजावला. जिल्ह्याची टक्केवारी घसरलीअमरावती : ७०.०८ टक्केवारी ठरली. तिवसा येथे ३०३ पुरूष व १०५ स्त्रियांसह एकूण ४०८ मतदान झाले. ही टक्केवारी ७२.९८ टक्के इतकी आहे. मोझरी येथे २४८ पुरूष व १४१ स्त्री असे एकूण ३८९ मतदान झाले. ही ७५.५३ टक्केवारी आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ९४४ मतदारांपैकी ४३४ पुरुष, १७४ स्त्री असे एकूण ६०८ मतदान झाले. ही ६४.४ टक्केवारी आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यात ८५ टक्के, वरुड येथे ६५.२१ टक्के मतदान झाले. ६ फेब्रुवारीला येथील विभागीय क्रीडा संकुल येथे मतमोजणी होणार आहेया मतमोजणी केंद्रावर जिल्ह्यासह अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यातील २८० मतदान केंद्रांवरील मतदान साहित्य जमा करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. या निवडणुकीत झालेल्या मतदानात अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झाले. मात्र टक्केवारीत जिल्हा विभागात शेवटच्या स्थानी आहे.