शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

६० कोटींचे दुष्काळी अनुदान वाटप बाकी

By admin | Published: March 17, 2017 12:16 AM

खरीप २०१५ मध्ये अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या टंचाई स्थितीची भरपाई करण्यासाठी शासनाने कपाशी

खरीप २०१५ साठी मदत : चांदूरबाजार तालुक्यात १०० टक्के वाटप अमरावती : खरीप २०१५ मध्ये अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या टंचाई स्थितीची भरपाई करण्यासाठी शासनाने कपाशी व सोयाबीन पिकांचा विमा न काढलेल्या शेतकऱ्यांना विमा जाहीर झाल्याच्या ५० टक्के प्रमाणात मदत देण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने जिल्ह्यात जानेवारी २०१७ मध्ये १०९ कोटी उपलब्ध केले. मात्र यापैकी ६० कोटीचा निधी अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केलेला नाही. अमरावती जिल्ह्यात पीक विमा न काढलेल्या एक लाख ९६ हजार ९०८ कपाशी व सोयाबीन उत्पादकांसाठी दोन लाख ४७ हजार ८९६ क्षेत्रासाठी १०९ कोटी ३६ लाख रुपये १० जानेवारीला वितरित केले होते. दरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समितींची सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महसूलची यंत्रणा कार्यरत होती. त्यामुळे निधी वाटप रखडले. मात्र या आठवड्यात हा दुष्काळ निधी वाटपाचा वेग वाढला आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारपर्यंत जिल्ह्यात ६५ हजार ४१७ शेतकऱ्यांना ३९ हजार ८० हेक्टर क्षेत्रासाठी ४९ कोटी ९४ लाख ३३ हजार ५०६ रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात ७२४७ शेतकऱ्यांना ५ कोटी १४ लाख ८० हजार, भातकुली ६५१२ शेतकऱ्यांना ३ कोटी ३७ लाख ८८ हजार, तिवसा ५०१९ शेतकऱ्यांना ४ कोटी ३७ लाख ९३ हजार, नांदगाव ८९५६ शेतकऱ्यांना ६ कोटी ४८ लाख ३० हजार, चांदूररेल्वे ५२९६ शेतकऱ्यांना ७ कोटी ७० लाख, धामणगाव ४६१९ शेतकऱ्यांना दोन कोटी ३६ लाख, मोर्शी ५६१२ शेतकऱ्यांना ४ कोटी ४५ लाख, वरूड ४६७ शेतकऱ्यांना १८ लाख ७१ हजार, अचलपूर २८६० शेतकऱ्यांना २ कोटी ५६ लाख ७६ हजार, चांदूरबाजार ३९७८ शेतकऱ्यांना २ कोटी १४ लाख १२ हजार, दर्यापूर ३६५९ शेतकऱ्यांना २ कोटी ४ लाख ३१ हजार, अंजनगाव सुर्जी २९८७ शेतकऱ्यांना ४ कोटी ६२ लाख ५८ हजार, धारणी ४२८७ शेतकऱ्यांना २ कोटी ६ लाख १९ हजार व चिखलदरा तालुक्यात ३९१८ शेतकऱ्यांना २ कोटी ४१ लाख ६२ हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी) अनुदान वाटपाचा ४५.६६ टक्का सद्यस्थितीत अनुदान वाटपाचा टक्का ४५.६६ आहे. यामध्ये चांदूरबाजार तालुक्यात १०० टक्के अनुदान वाटप करण्यात आलेले आहे. अमरावती तालुक्यात ३९ टक्के, भातकुली २६, तिवसा ६२, नांदगाव ३७, चांदूररेल्वे ६३, धामणगाव २८, मोर्शी ५६, वरूड ५१, अचलपूर ६२, दर्यापूर ४५.१३, अंजनगाव सुर्जी ७७, धारणी २७ व चिखलदरा तालुक्यात ४७ टक्के वाटप करण्यात आले आहे.