शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

कपाशीला हेक्टरी ६० हजार, सोयाबीनला मिळणार ५१ हजार; खरीप पीक कर्ज वाटपाचे पीकनिहाय दर निश्चित

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: May 03, 2024 10:17 PM

यंदाचा खरीप हंगाम महिन्याभरावर आल्याने शेतकरी मशागतीत व्यस्त आहे.

अमरावती : आर्थिक संकटात असल्याने शेतकऱ्यांना खरिपाच्या पीक कर्जाचा मोठा आधार मिळतो. यंदा पीक कर्ज देण्यासाठी जिल्हास्तरीय बँकर्स समितीने (डीएलबीसी) पीकनिहाय हेक्टरी कर्ज वाटपाचे दर जाहीर केले आहे. यानुसार कपाशीला किमान ६०,५०० तर सोयाबीन पिकाला ५०,८३० रुपये हेक्टरी कर्ज मिळणार आहे.

यंदाचा खरीप हंगाम महिन्याभरावर आल्याने शेतकरी मशागतीत व्यस्त आहे. यानंतर पीक पेरणीसाठी त्याला आर्थिक मदतीची आवश्यकता असते. अशा वेळेस त्यांना बँकांद्वारे कर्ज देण्यात येते. १२ महिन्यात परतफेड केल्यास यावरील व्याज त्याच्या बँक खात्यात शासनाद्वारे जमा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध झाल्यास पिकांच्या उत्पादकतेमध्ये वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांना मदत होणार आहे.

जिल्हा बँकेचे पीक कर्ज सेवा सहकारी सोसायटीमार्फत तर राष्ट्रीयीकृत बँका थेट शेतकऱ्यांना कर्जवाटप करतात. यासाठी बँकांना राज्यस्तरीय बँकर्स समितीने (एसएलबीसी) लक्ष्यांक निश्चित केलेला आहे. यामध्ये ५ ते १० टक्क्यापर्यंत कमी-अधिक करीत जिल्हास्तरीय बँकर्स समितीने (डीएलबीसी) जिल्ह्यातील बँकांना टार्गेट दिलेले आहे. व यासाठी पीक कर्ज वाटपाचे दरदेखील निश्चित केलेले आहे. त्यामुळे बँकांनी खरिपासाठी लवकर कर्जपुरवठा करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

असे आहेत हेक्टरी कर्ज वाटपाचे दरकपाशी (जि) : ६०५०० ते ६३५२५ज्वारी (सं) : २९९६० ते ३१९७०तूर : ४१५८० ते ४३५६०सोयाबीन : ५०८३० ते ६१२१५मूग : २४२०० ते २५४१०उडीद : २४२०० ते २५४१०

गहू, हरभरा, करडईसाठी दर निश्चितपीक कर्ज वाटपासाठी गव्हाला हेक्टरी ४४२०० ते ४६२००, हरभऱ्याला ३१६८० ते ४३८९० हरभरा (बा.) ३८२८० ते ४८५१०, कांदा ६६६७५ ते ७४९७०, भुईमूग (ख) ३६३२० ते ४२९९०, मिरची : ६६६७५ ते ८५९९५, संत्रा-मोसंबी १०५६०० ते ११६१६०, केळी १०५००० ते ११०२५० या दरम्यान हेक्टरी पीक कर्ज खरीप हंगामासाठी मिळणार आहेत. 

टॅग्स :Farmerशेतकरी