शहरं
Join us  
Trending Stories
1
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
3
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
4
विवाहांच्या मुहुर्तांदरम्यान सोन्या-चांदीच्या दरात बदल, पटापट चेक करा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर
5
BBA चं शिक्षण आणि व्यवसायाचं स्वप्न...; पैसे नव्हते म्हणून ६० लाखांची BMW घेऊन झाला फरार
6
छत्तीसगडच्या सुकमात भीषण चकमक; 10 नक्षलवाद्यांचा खात्मा, ओख-47 सह अनेक शस्त्रे जप्त
7
अंबरनाथच्या उच्चभ्रू सोसायटीतील घटना; कुमारी मातेने इमारतीतून फेकले अर्भक
8
WhatsApp चं अप्रतिम फीचर! आता व्हॉईस नोट्स टेक्स्टमध्ये बदलता येणार; जाणून घ्या, कसं?
9
नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
10
IPL 2025 कधीपासून सुरु होणार? BCCI ने पुढील ३ वर्षांच्या तारखा करून टाकल्या जाहीर
11
Wipro Bonus Shares : १४ व्यांदा बोनस शेअर देणार 'ही' दिग्गज कंपनी, ५ डिसेंबर पूर्वी रेकॉर्ड डेट
12
निकालांआधीच मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू; महायुती, मविआमधील या  नेत्यांची नावं चर्चेत
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान
14
Vikrant Massey : "ते टीव्ही स्टार्सला कमी लेखतात"; विक्रांत मेस्सीने इंडस्ट्रीतील मोठ्या स्टार्सची केली पोलखोल
15
१० मोठ्या मालमत्ताधारकांकडे ६०० कोटी रुपयांची थकबाकी; BMC ने दिला इशारा
16
IPL 2025: लिलावात 'या' भारतीय खेळाडूवर लागेल २५-३० कोटींची बोली; Mr. IPL ची भविष्यवाणी
17
धनुष-नयनतारा आमने सामने! ३ सेकंदाच्या व्हिडिओवरुन सुरु आहे वाद; एकाच रांगेत बसले अन्...
18
IND vs AUS : अवघ्या १५० धावांत टीम इंडिया All Out; पदार्पणात Nitish Reddy ची लक्षवेधी खेळी
19
या वीकेंडला OTT वर बघायला मिळेल सिनेमा अन् वेबसीरिजची मेजवानी! वाचा संपूर्ण यादी
20
जगातील सर्वात महाग कॉफी! महिन्याचा पगारही कमी पडेल, विकणारा आहे शेतकरी

निवृत्त प्राध्यापकाला तब्बल ६१.७४ लाख रुपयांना गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 1:49 PM

डिजिटल अरेस्ट : मनी लाँड्रिंगचे पैसे आले!

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : धामणगाव रेल्वे तालुक्यातील निवृत्त प्राध्यापकाला चौकशी व अटकेची भीती दाखवत चक्क ६१ लाख ७४ हजार रुपयांना गंडविण्यात आले. सध्या राज्यात सायबर गुन्हेगारांनी 'डिजिटल अरेस्ट' या नावाने नवीन शक्कल लढवली आहे. स्वतःला सीबीआय, पोलिस, ईडी किंवा लष्करी अधिकारी असल्याचे सांगून गुन्हेगार नागरिकांना व्हिडीओ कॉल करतात. संबंधित व्यक्तीला 'डिजिटल अरेस्ट' केल्याचे सांगत कारवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी करतात तसेच डेबिट कार्डचा पासवर्ड विचारून त्यांचे बँकेतील खाते रिकामे करतात 

३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १२.३० अशा साडेतीन तासात आरोपींनी त्या निवृत्त प्राध्यापकाला ६१.७४ लाख रुपये आरटीजीएस करण्यास भाग पाडले. त्यापूर्वी सावळा येथील त्या वृद्धाला व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉल गेला. ५३८ कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केलेले जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांनी काही रक्कम आपल्या खात्यात टाकली. आपण त्याची चौकशी करीत आहोत. त्यासाठी मुंबईला हजर राहा, असे त्यांना बजावण्यात आले. त्यांनी नकार दिला तेव्हा ती रक्कम आरटीजीएस करा, चौकशीअंती आम्ही ती परत करू, अशी बतावणी केली. सायबर भामट्यांनी कुटुंबीयांच्या शेअर्स व बँक खात्यांची माहिती मिळविली. त्यानंतर रक्कम खात्यातून ऑनलाईनच काढली गेली. 

निवृत्त अधिकारी- कर्मचारी, वृद्ध व्यापारी लक्ष्य 'डिजिटल अरेस्ट' सायबर क्राईम म्हणून अलीकडे झपाट्याने होणाऱ्या प्रकाराबाबत उच्चशिक्षित तरुण किंवा तरुणी कायदे आणि नियमांबाबत माहिती ठेवून असतात. त्यामुळे सायबर गुन्हेगार 'डिजिटल अरेस्टची क्लुप्ती सेवानिवृत्त झालेले अधिकारी-कर्मचारी किंवा वृद्ध व्यापारी यांच्यावर वापरतात. ज्येष्ठ नागरिकांना तंत्रज्ञान किंवा कायदेशीर तरतुदींबाबत अनेकदा पुरेशी माहिती नसते. त्यामुळे त्यांची फसवणूक करणे सोपे जाते. ही बाब हेरून सायबर गुन्हेगार त्यांना निवडतात. सध्या त्यांच्या रडारवर अशाच प्रकारचे लोक आहेत.

"सावळा येथील निवृत्त प्राध्यापकाची झालेली आर्थिक फसवणूक हा 'डिजिटल अरेस्ट' मध्ये मोडणारा सायबर क्राईम आहे. सायबर गुन्हेगाराचा व्हिडीओ कॉल आल्यानंतर न केलेल्या गुन्ह्यांत अडकण्याची भीती बाळगू नये."- गिरीश ताथोड, ठाणेदार, दत्तापूर

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमArrestअटकdigitalडिजिटलAmravatiअमरावती