दुष्काळाची झळ : गुरे, वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती मोहन राऊ त धामणगाव रेल्वेयंदा सरासरीपेक्षा अल्प झालेल्या पावसामुळे उन्हांचा पारा वाढण्यापूर्वीच जिल्ह्यातील ६२ सिंचन तालव कोरडे पडले आहेत़ त्यांत पाणीच नसल्यामुळे चरायला गेलेली गुरे व वण्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे़ ही स्थिती मार्च एंडिंग असल्यामुळे आगामी मे महिन्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे़जिल्ह्यात जिल्हा परिषदेंतर्गत ६५ सिंचन तलाव आहेत़ या तलावांची खोली सरासरी अडीच मीटर ते चार मीटरपर्यंत करण्यात आली आहे़ यंदाच्या पावसाळ्यात ११ तलाव केवळ १०० टक्के भरले होते, तर १७ तलाव ६० टक्क्यांवर तसेच २० तलावांत ५० टक्के जलसाठा, ८ तलावांत २५ टक्के व ४ तलावांत १० टक्केच जलसाठा नोव्हेंबर महिन्यापर्यंत होता. आता या तलावांतील जलसाठा पूर्णत: संपला असून सध्या यातील अनेक तलाव कोरडे पडले आहेत़ गावातील जनावरे सकाळी चरायला गेल्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी या तलावाचा मोठा आधार त्यांना मिळत असत. विशेषत: जंगलातील वन्यप्राण्यांना पाणी पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता. आता तलावात पाणीच नसल्यामुळे या वन्यप्राण्यांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे़धारणी तालुक्यात असलेल्या १९तलावापैकी केवळ चार तलावात २० टक्के पाणीसाठा आहेत़, तर दुसऱ्या क्रमांकाचे तिवसा तालुक्यात असलेल्या ११ तलावांपैकी केवळ दिवाणखेड या तलावात एक मीटर जलसाठा आहे़ अमरावती, अचलपूर, नांदगाव खंडेश्वर या तालुक्यातील प्रत्येकी पाच तलावांतील पाणीसाठा संपला तर चांदूरबाजार मोर्शी या तालुक्यातील प्रत्येकी तीन लघु सिंचन तलावात केवळ दीड टक्के जलसाठा, वरूड तालुक्यातील सहा लघु सिंचन तलावांचीदेखील हीच स्थिती असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे़
जिल्ह्यातील ६२ तलाव कोरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2016 12:08 AM