शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

वऱ्हाडात यंदा अस्मानी अन् सुल्तानी संकटाचे ६२९ शेतकरी बळी; दरदिवशी 3 शेतकऱ्यांची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 4:29 PM

दर आठ तासांत एक शेतकरी कवटाळतो मृत्यूला

अमरावती : सलग दुष्काळ, नापिकी व नैसर्गिक आपत्तीने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. कर्जमाफीच्या जाचक निकषात अद्यापही हजारो शेतकऱ्यांच्या सात-बाऱ्यावरचा बोजा कायम असल्याने कजाची परतफेड करायची कशी अन् जगावं कसं, प्रश्न त्यांना सतावत आहे. सततच्या संघर्षात धीर खचल्याने यंदा १५ ऑगस्टपर्यंत ६२९ शेतकऱ्यांनी जीव कवटाळल्याचे अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यातील दाहक वास्तव आहे. सन २००१ पासून आतापर्यंत १६,४७६ शेतकरी आत्महत्या झाल्याचा धक्कादायक शासन अहवाल आहे.

मागील पाच वर्षांपासून दररोज तीन म्हणजेच दर आठ तासांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचे चित्र असल्याने शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र केव्हा, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे. राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या सध्या बुलडाणा जिल्ह्यात होत आहेत. या जिल्ह्यात यंदा १७२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. अमरावती जिल्ह्यात १५३, अकोला ७२, यवतमाळ १४६, वाशीम ५५, तर नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यात ३१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.

शेतकरी आत्महत्यांनी महाराष्ट्र डागाळला आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे सूत्र हाती घेताना केली होती. आज पाच वर्षांनीदेखील महाराष्ट्राची तीच अवस्था आहे. किंबहुना यामध्ये वाढ झालेली आहे. सलग चार वर्षांपासूनचा दुष्काळ यामुळे कर्जबाजारी झालेला शेतकरी यातून सुटका होण्यासाठी मृत्यूला जवळ करीत असल्याचे चित्र अमरावती विभागात आहे. शेतकºयांसाठी असलेला योजनांचा लाभ त्याला मिळत नाही. यावर उपरेच मजा करतात याला राजाश्रय देखील असल्याने अंमलबजावणी करणारी यंत्रणा हतबल झाली आहे. त्यामुळेच वºहाडात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू असल्यामागचे वास्तव आहे.

सन २००१ पासून १६,४७६ शेतकरी आत्महत्याशासन स्तरावर सन १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येत आहे. त्यानुसार आतापर्यंतच्या कालावधीत १६ हजार ४७६ शेतकºयांनी मृत्यूचा फास जवळ केला आहे. यापैकी फक्त ७,४३५ प्रकरणांमध्येच शासनाद्वारा मदत देण्यात आलेली आहे. निम्म्यापेक्षा अधिक ८,७९९ प्रकरणांत शाासकीय मदत नाकारली आहे. यंदाच्या वर्षातील २४२ प्रकरणे अद्यापही चौकशीसाठी प्रलंबित आहेत. शासकीय मदतीमध्ये ७० हजारांची मुदतठेव व ३० हजार रुपये रोख अशी तरतूद आहे. सन २००५ पासून शासकीय मदतीमध्ये अजूनही सुधारणा करण्यात आलेली नाही.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याAmravatiअमरावती