बच्चू कडू यांचे प्रयत्न : अनुदानाचे १ कोटी ४० लाख प्राप्तचांदूरबाजार : पालिका हद्दीतील घरकूल लाभार्र्थींना एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी सुधार कार्यक्रमांतर्गत ६४६ लाभार्र्थींना प्रत्येकी ७५ हजार रुपयांचा वाढीव अनुदान वाटप करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाचा एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी सुधारणा अंतर्गत २०१३ साली शहरात ६४६ घरकुलाला मान्यता मिळाली होती. याकरिता आ. बच्चू कडू यांनी अथक प्रयत्न करून घरकूल लाभार्थिंना हक्काचे घर मिळावे, या अनुषंगाने कोट्यवधींचा निधी खेचून आणला. त्यानुसार शहरात अनुदान देण्यात आले होते. मात्र हा निधी अपुरा पडत असल्याने आ.कडू यांनी घरकूल लाभार्थींसाठी वाढीव अनुदानाची मागणी केली होती. २०१२ मध्ये घरकूल लाभार्थींना शासनातर्फे १ लाख २२ हजार ५०० रुपये अनुदान देण्यात आले, तर १० टक्के रक्कम लाभार्थीने खर्च करावे, असे आदेश होते. मात्र मार्च २०१३ नंतर शासकीय बांधकाम खर्चात वाढ झाल्याने या कालावधीनंतर बांधकाम पूर्ण झालेल्या लाभार्र्थींना वाढीव अनुदान ७५०० रुपये प्रतीलाभार्थी देण्यात येणार असल्याचे पत्र २५ जून २०१५ रोजी नगरपालिकेला प्राप्त झाले. त्यानुसार नगरपरिषदेला घरकूल लाभार्थींकरिता ४ कोटी ९८ लक्ष रुपये वाढीव निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी १ कोटी ४० लक्ष रुपये निधी नगरपालिकेला प्राप्तदेखील झाला आहे. त्यानुसार मार्च २०१३ नंतर बांधकाम पूर्ण झालेल्या ६४६ लाभार्र्थींना प्रत्येकी ७५ हजार रुपयांप्रमाणे अनुदान वाटप करण्याचे आदेश नगराध्यक्ष मनीषा नांगलिया यांनी अधिकाऱ्यांना दिले. यासंदर्भात बुधवारी झालेल्या बैठकीत नगराध्यक्ष मनीषा नांगलिया यांनी तत्काळ सर्वेक्षण करुन ७ दिवसांच्या आता वाढीव अनुदानाचे धनादेश वितण करण्याचा निर्णय घेतला. यावेळी गटनेता नितीन कोरडे, शिक्षण सभापती गोपाल तिरमारे, नगरसेवक एजाज अली, भैय्यासाहेब लंगोटे, विशाल तायवाडे, सुषमा बर्वे, लविना आकोलकर, मिनाक्षी औणकरसह मुख्याधिकारी, बांधकाम अभियंता, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार प्रामुख्याने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
६४६ घरकूल लाभार्र्थींना वाढीव अनुदान
By admin | Published: December 04, 2015 12:40 AM