शहरं
Join us  
Trending Stories
1
ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन
2
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
3
अदानी ग्रुपचे शेअर्स घरसल्याने LICला मोठा धक्का; तब्बल १२ हजार कोटी रुपये बुडाल्याचा अंदाज
4
न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली...
5
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांसोबत गेले तर...? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
6
३० वर्षांनी मतदानाच्या टक्केवारीत वाढ; सरकार बदलणार की तेच राहणार? इतिहास काय सांगतो
7
Shah Rukh Khan : शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीबाबत खळबळजनक खुलासा
8
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
9
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
10
Kalbhairav Jayanti 2024: कालभैरव जयंतीला 'हे' तोडगे करा आणि संसार तापातून मुक्त व्हा!
11
'धूम २'मध्ये ऐश्वर्या राय बच्चनने हृतिक रोशनसोबत दिला होता किसिंग सीन, याबद्दल अभिनेत्री म्हणाली....
12
कार्यकर्त्यांना वाटतं फडणवीस यांनीच CM व्हावं, पण...; मुख्यमंत्रीपदासंदर्भात बावनकुळेंचं सूचक विधान
13
Ration Card धारकांसाठी मोठी बातमी! ५.८ कोटी शिधापत्रिका होणार रद्द; तुमचं नाव तर यात नाही ना?
14
'या' ५१ जागा ठरवणार खरी शिवसेना कुणाची; एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंपेक्षा वरचढ ठरणार?
15
अमिताभ बच्चन यांचा ब्लॉग चर्चेत, म्हणाले, "मी माझ्या कुटुंबाविषयी क्वचितच बोलतो कारण..."
16
४ ग्रहांचे गोचर: ७ राशींना डिसेंबर करेल मालामाल, अनेक लाभ; उत्तम नफा, पद-पैसा-ऐश्वर्य काळ!
17
'खलनायक'मधील साँगसह Yashasvi Jaiswal साठी आला टीम इंडियासाठी 'नायक' होण्याचा संदेश
18
शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत
19
महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली
20
Reliance JIO-BP चा पेट्रोल पंप डीलर बनण्याची संधी, जाणून घ्या काय काय करावं लागेल?

६५ संक्रमित; एकूण १५५०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 5:00 AM

महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात चाचण्यांची संख्या वाढविल्याने सध्या संक्रमितांची संख्या वाढतीवर आहे. रोज नव्या भागात कोरोनाग्रस्त निष्पन्न होत असल्याने चिंतेत भर पडली आहे. गुरुवारी प्राप्त अहवालात ६५ संक्रमितांची नोंद झाल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १५५० वर पोहोचली आहे.

ठळक मुद्देकोरोनाग्रस्तांची संख्येत वाढ: संक्रमणमुक्तांचेही प्रमाणही वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात चाचण्यांची संख्या वाढविल्याने सध्या संक्रमितांची संख्या वाढतीवर आहे. रोज नव्या भागात कोरोनाग्रस्त निष्पन्न होत असल्याने चिंतेत भर पडली आहे. गुरुवारी प्राप्त अहवालात ६५ संक्रमितांची नोंद झाल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १५५० वर पोहोचली आहे.सकाळी प्राप्त अहवालानुसार सिंधी कॅम्प, बडनेरा येथे ५५ वर्षीय, छायानगरातही ५५ वर्षीय, चांदूर बाजार तालुक्यात खरपी येथे २७ व ६५ वर्षीय, द्वारकानाथ कॉलनीत ७४ वर्षीय, अचलपूर येथे ६० वर्षीय, वलगाव येथे ४४ वर्षीय, कॅम्प भागात गुरुकृपा कॉलनीत ६९ वर्षीय, अंबागेट भागात पटवीपुरा येथे २५ वर्षीय, भिवापूरकरनगरात २६ वर्षीय, लक्ष्मी नगरात ३९ वर्षीय, गणेश कॉलनीत ३३ वर्षीय, मसानगंज येथे ३९ वर्षीय, सुंदरलाल चौक विजयनगर येथे २८ वर्षीय, गाडगेनगरात २१ वर्षीय, साई नगरातील गावंडे लेआऊट येथे ३१ वर्षीय व देशमुख लॉनच्या मागील भागातील सर्वोदय विकास कॉलनीत ३५ वर्षीय पुरुष तसेच अचलपुरात ६० वर्षीय, दर्यापुरात ८० वर्षीय, वडाळी कॅम्प येथे ५६ वर्षीय, नवसारी येथे २५ वर्षीय, लक्ष्मीनगर येथे २० वर्षीय, गाडगेनगर पलाश लाईन येथे ५२ वर्षीय, गुरुकृपा कॉलनीत ९, १५ व ३५ वर्षीय, साबनपुऱ्यात ५७ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.दुपारच्या अहवालात कॅम्प येथे ५३ वर्षीय, देऊरवाडा ४५ वर्षीय, राधानगरात ३३ वर्षीय शंकरनगरात १७ व ४७ वर्षीय, बडनेरा चंद्रनगरात ३० वर्षीय, गोपालनगरात २५ वर्षीय, बच्छराज प्लॉट येथे ७७ वर्षीय, हरिगंगा आॅईल मिलजवळ ३० वर्षीय, आनंदनगरात ५० वर्षीय, जाफरजीन प्लॉट येथे ६० वर्षीय, खत्री कंपाऊंड येथे ३० वर्षीय, अर्जुननगरात ३४ वर्षीय पुरुष व शंकरनगरात १५ वर्षीय, बडनेरा मिलचाळ येथे ५५ वर्षीय, वडाळीला ३३ वर्षीय, माहुली जहांगीरला ३१ वर्षीय, राजापेठला २७ वर्षीय, हरिगंगा आॅईलमिल येथे ५० वर्षीय, अचलपूरला ३१ वर्षीय व मोर्शी तालुक्यात पुलगाव येथे ६० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.रात्रीच्या अहवालात १७ पॉझिटिव्हगुरुवारी रात्री प्राप्त अहवालात १७ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. यामध्ये अकोट तालुक्यात मावला येथील २८ वर्षीय पुरुष, शंकरनगरात ३५ वर्षीय महिला, अचलपूरला २४ वर्षीय पुरुष, काटआमला येथे २४ वर्षीय पुरुष, राजापेठ येथे ५८ वर्षीय पुरुष, कोर्ट रोड येथे ३० वर्षीय पुरुष, नवाथे प्लॉट येथे ३७ वर्षीय पुरुष, सोनल कॉलनीत ३४ वर्षीय पुरुष, पूर्णानगरात १४ वर्षीय बालिका, नरहरीनगरात ६० वर्षीय महिला, रहमतनगरात ६५ वर्षीय महिला, परतवाड्यात ६२ वर्षीय पुरुष, चांदूर रेल्वे तालुक्यात पळसखेड येथे ५० वर्षीय महिला, पळसखेड येथे ८ वर्षीय बालिका, दर्यापूर तालुक्यात आमला येथे ५२ वर्षीय पुरुष, अचलपूर तालुक्यात ५५ वर्षीय पुरुष, तसेच कंवरनगरात ६५ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या