शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

६५ पैसेवारीत जिल्ह्याची पीकस्थिती नजरअंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 10:27 PM

यंदाच्या खरिपात १० आॅगस्टपासून पावसाची दडी असल्याने सोयाबीनसह मूग व उडीद पीक बाद झाले असताना सोमवारी जिल्हा प्रशासनाने नजरअंदाज ६५ पैसेवारी जाहीर केली. यानंतर सुधारित व अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येणार असली तरी यामध्ये जिल्ह्यातील पिकस्थितीचे वास्तवादी चित्र नाही. त्यामुळे ‘हेच का अच्छे दिन’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

ठळक मुद्देवास्तववादी चित्र नाहीच : हेच का अच्छे दिन, शेतकऱ्यांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरिपात १० आॅगस्टपासून पावसाची दडी असल्याने सोयाबीनसह मूग व उडीद पीक बाद झाले असताना सोमवारी जिल्हा प्रशासनाने नजरअंदाज ६५ पैसेवारी जाहीर केली. यानंतर सुधारित व अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येणार असली तरी यामध्ये जिल्ह्यातील पिकस्थितीचे वास्तवादी चित्र नाही. त्यामुळे ‘हेच का अच्छे दिन’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.जिल्ह्यात १,९८५ गावामधील खरिपाची नजरअंदाज ६५ पैसेवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी ३० सप्टेंबरला जाहीर केली. यंदाच्या खरिप हंगामात केवळ नांदगाव खंडेश्वर वगळता जिल्ह्यातील १३ तालुक्यांत पावसाची सरासरी माघारली आहे. जिल्ह्यात सरासरी १८१ मिमी पावसाची तूट आहे. मृग नक्षत्रानंतर जुलै महिन्यात पावसाने सरासरी गाठली. त्यामुळे पिकांची वाढदेखील समाधानकारक झाली. मात्र, सोयाबीवर चक्रीभृंगा, खोडमाशी सह विषानूजन्य रोग व किडीचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतर १० आॅगस्टपासून तब्बल ४५ दिवस पावसात खंड असल्यामुळे सोयाबीन जाग्यावरच विरले. सोयाबीनला फुलोऱ्यावर व शेंगा भरत असताना पावसाची अत्यंत गरज असते. यावर्षी पावसाचा खंड असल्याने सोयाबीनच्या शेंगा पोचट राहिल्या. यामुळे सरासरी उत्पादनात किमान ४० टक्के घट येणार आहे. वास्तविकता यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्याच्या ७.२८ लाख पेरणीक्षेत्राच्या तुलनेत सोयाबीनचे ३ लाख हेक्टर क्षेत्र आहे. सद्यस्थितीत २ लाख हेक्टरवरील सोयाबीन बाधित असताना खरिपाची नजरअंदाज ६५ पैसेवारीत जिल्ह्याची वस्तुस्थिती नजर अंदाज केल्याचे स्पष्ट झाले आहे.शेतकऱ्यांत अन्याय झाल्याची भावनाकमी पावसामुळे तूर पिकाची वाढ खुंटली होती. मात्र, २१ व २२ सप्टेंबरला आलेल्या पावसामुळे तुरीला दिलासा मिळाला असला तरी खरिपाच्या पैसेवारीमध्ये तूर पिकाची गणना होत नाही. ते पैसेवारीसाठी रबी पीक आहे. कपाशीवर यंदाही बोंडअळीचा अटॅक झालेला आहे. तसेच अपुऱ्या पावसामुळे मूग व उडीद पीक उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे नजरअंदाज पैसेवारीत जिल्ह्यातील शेतकºयांवर अन्याय झाल्याची भावना आहे.तालुकानिहाय नजरअंदाज पैसेवारीजिल्हा प्रशासनाने रविवारी जाहीर केलेल्या नजरअंदाज पैसेवारीनुसार अमरावती तालुक्यात १४४ गावांत ६३ पैसे, भातकुली १३७ गावांत ६७, तिवसा ९५ गावांत ५९, चांदूर रेल्वे ९३ गावांत ५८, धामणगाव रेल्वे ११२ गावांत ६६, नांदगाव खंडेश्वर १६१ गावांत ६६, मोर्शी १५६ गावांत ६१, वरूड १४० गावांत ६८, अचलपूर १८४ गावांत ६८, चांदूरबाजार १७० गावांत ६०, दर्यापूर १५० गावांत ६७, अंजनगाव सुर्जी १२७ गावांत ६९, धारणी १५३ गावांत ६७, तर चिखलदरा तालुक्यात १६३ गावांत ६७ पैसे नजरअंदाज जाहीर करण्यात आलेली आहे.