आॅनलाईन लोकमतअमरावती : वर्षभरात गुरांना दोनवेळा लाळ्या -खुरकुत रोगाची प्रतिबंधक लस देण्यात येते. सहा महिन्यांत लसीचा पुरवठा न झाल्यामुळे गुरांचे लसीकरण रखडले होते. आता शासनाच्यावतीने सद्यस्थितीत या रोगाची ६,५०,००० लसीकरणाची मात्रा प्राप्त झाली आहे. तीन आठवड्यात लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे.पशुसंवर्धन विभागाच्या पाहणीत जिल्ह्यात सध्या लाळ्या-खुरकुत रोगाची लक्षणे दिसून आले नाही. मात्र उन्हाळ्यात जनावरांवर ताण निर्माण होऊन रोगराई येऊ शकते, या बाबीचा विचार करून पशुपालकांनी सर्व गाई व म्हैसवर्ग पशुंना नजीकच्या दवाखान्यातून लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. लसीकरणानंतर जनावरांना सावलीत बांधून भरपूर पाणी पाजावे, बैलांना एक दिवस विश्रांती द्यावी, असे या विभागाने सांगितले. सकाळी वा सायंकाळी प्रतिबंधक लसीकरण करावे, लाळ्या खुरकुत रोग हा विषाणुजन्य असल्याने उपचारापेक्षा प्रतिबंधक उपाय अधिक लाभदायक आहे. पशुपालकांनी आपल्याकडील गायवर्ग व म्हैसवर्गातील लहानमोठ्या पशूंना लस टोचून घेणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकºयांकडील एकाच वेळेस सर्व पशुंना लस देणे आवश्यक आहे. काही जनावरे लसीकरण सुटल्यास रोगाचा प्रादूर्भाव निर्माण होवू शकतो करिता पशुसंवर्धन विभागाच्यावतीने १०० टक्के लसीकरण करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ मोहन गोहत्रे व जिल्हा पशुसंर्वधन अधिकारी डॉ. विजय रहाटे यांनी केले.अन्यथा दुध उत्पादनात ५० टक्क्यांनी घटलाळ्या खुरकुत रोग हा आर्थिक नुकसान करणारा रोग असल्याने वेळेत प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. रोगाची साथ उद्भवल्यास उपचारावर खर्च होवून दूध उत्पादनात ५० टक्के घट येते व शेतीच्या कामी असलेल्या बैलाच्या आजारामुळे शेतीची कामे खोळंबली जातात. अमरावती जिल्ह्यात गायवर्ग ५३१२६९ व म्हैसवर्ग ११८९५९ अशी एकूण ६५०२२८ पशुधन १९ व्या पशुगणना २०१२ नुसार नोंद आहे, या सर्वांना लसीकरण करणे महत्वाचे आहे.
लाळ्या-खुरकुत लसीची ६.५० लाख मात्रा उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 11:00 PM
वर्षभरात गुरांना दोनवेळा लाळ्या -खुरकुत रोगाची प्रतिबंधक लस देण्यात येते. सहा महिन्यांत लसीचा पुरवठा न झाल्यामुळे गुरांचे लसीकरण रखडले होते.
ठळक मुद्देतीन आठवड्यांचा अवधी : लसीकरणाचे पशुसंवर्धन विभागाकडून आवाहन