लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत गेल्या साडेतीनशे दिवसांत विविध गुन्ह्यांबद्दल तब्बल ६ हजार ७३७ एफआयआर नोंदविले गेले. यामध्ये ३ हजार २३१ पैकी २ हजार ३२७ गंभीर गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश मिळाले. यावरून गुन्ह्यांचा छडा लागण्याचे प्रमाण कमी असल्याचे आढळून येत आहे.शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील दहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांचा गोषवारा पाहता, २०१७ या वर्षाच्या तुलनेत यंदा नोव्हेंबर २०१८ अखेरपर्यंत हत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. २०१७ मध्ये १४ हत्या, तर यंदा २५ हत्या घडल्या. या सर्व घटनांचा छडा पोलिसांनी लावला आहे. याशिवाय प्राणघातक हल्ल्याच्या २०१७ मध्ये ३१ प्राणघातक हल्ले झालेत. त्याच्या तुलनेत यंदा ३८ प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. घरफोड्यांच्या सर्वात मोठी वाढ झाली आहे. २०१७ मध्ये एकूण ९८ पैकी २१ घरफोड्यांचाच छडा लावला. २०१८ मध्ये ८३ घरफोड्यांपैकी केवळ १४ गुन्हे उघड झाले. २०१७ मध्ये लैंगिक अत्याचाराच्या ५४ घटना घडल्या, तर २०१८ मध्ये तब्बल ७१ महिलांवर लैंगिक अत्याचार झाले. २०१७ मध्ये दरोड्याची एकही घटना नव्हती, यंदा ती दोनवर पोहोचली आहे. २०१७ मध्ये १६ चेनस्नॅचिंग झाल्या. त्यापैकी केवळ सात गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले होते. २०१८ मध्ये २१ पैकी सहा गुन्हे उघड झाले आहेत. २०१७ मध्ये २४० दुचाकी चोरीच्या घटना घडल्या असून, त्यापैकी केवळ ७३ गुन्हे उघड झाले. २०१८ मधील २७५ गुन्ह्यांपैकी केवळ ५८ गुन्ह्यांचे छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले.एकंदर २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये गुन्ह्यात वाढ आणि डिटेक्शन कमी असल्याचे दिसून येते. सर्वात कमी डिटेक्शन घरफोडीच्या घटनामध्ये झाल्याची नोंद आहे. या घटना अद्याप शहरात घडत आहेत. त्यामुळे घरफोड्यांनी पोलिसांपुढे आव्हान उभे केल्याचे चित्र आहे.विनयभंगाच्या घटना वाढल्यादिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार व विनयभंगाच्या घटना वाढतच आहेत. २०१७ मध्ये शहरात महिलांसह बालिकांच्या १७४ विनयभंगाच्या घटना झालेत. त्यापैकी १६७ गुन्ह्यांचा छडा पोलिसांनी लावला, तर यंदा ३०९ गुन्हे नोंदविण्यात आले. त्यापैकी ३०३ गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला आहे. दोन्ही वर्षांमध्ये यंदा विनयभंगाच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश असल्याचे दिसून येते.
साडेतीनशे दिवसांत ६,७३७ एफआयआर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 11:03 PM
शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत गेल्या साडेतीनशे दिवसांत विविध गुन्ह्यांबद्दल तब्बल ६ हजार ७३७ एफआयआर नोंदविले गेले. यामध्ये ३ हजार २३१ पैकी २ हजार ३२७ गंभीर गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश मिळाले. यावरून गुन्ह्यांचा छडा लागण्याचे प्रमाण कमी असल्याचे आढळून येत आहे.
ठळक मुद्देशहर पोलीस आयुक्तालय : ३२३१ गुन्ह्यांपैकी २३२७ उघड, घरफोड्यांचे डिटेक्शन कमी