अमरावती - राज्यातील ६,७४२ दवाखाने-रुग्णालयांमध्ये विविध त्रुटी आढळून आल्याची धक्कादायक माहिती आरोग्य सेवेच्या अतिरिक्त संचालकांनी उघड केली आहे. त्याअनुषंगाने त्रुटी आढळून आलेल्या राज्यातील या सर्व दवाखान्यांची पुनर्तपासणी करण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेला देण्यात आले आहेत. १५ मार्च ते ३१ मे २०१७ या कालावधीत केलेल्या तपासणीत ६७४२ दवाखाने-रुग्णालयांमध्ये या त्रुटी आढळून आल्या होत्या. त्याअनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाºयांसह बृहन्मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकाºयांना तपासणीचा धडक कार्यक्रम देण्यात आला आहे. १ मे ते ३० जून २०१८ या कालावधीत समिती सदस्यांनी या सर्व दवाखान्यांची पुन्हा तपासणी करावी व त्रुटीची पूर्तता झाली किंवा कसे, याची खतरजमा करावी. त्याचा अहवाल कार्यालयास पाठविण्यात यावा, असे निर्देश कुटुंब कल्याण, माता-बाल ुसंगोपन व शालेय आरोग्य सेवेच्या अतिरिक्त संचालकांनी १९ मार्चला दिले आहेत. सदर तपासणीसाठी आरोग्य विभाग, महसूल, पोलीस व अन्न औषध प्रशासन विभागातील अधिकाºयांची संयुक्त पथके बनविण्यात येणार आहेत. तपासणीच्या या धडक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व वैद्यकीय आरोग्य अधिकाºयांकडे देण्यात आली आहे.
ज्या दवाखाने-रुग्णालयांमध्ये गतवर्षी त्रुटी आढळून आल्या होत्या, त्या त्रुटींची पूर्तता झाली किंवा कसे, याची खातरजमा करण्यासाठी पुनर्तपासणीचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यासाठी पथकांचे कार्यान्वयन केले जात आहे. - सीमा नैताम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका