शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

अचलपूर मतदारसंघातील ८३ गावांना मिळणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 6:00 AM

अचलपूर तालुक्यातील सपन प्रकल्पावरील या पाणीपुरवठा योजनेला आमदार बच्चू कडू यांनी ३ आॅगस्ट २०१० रोजी तत्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्याकडून तत्त्वत: मान्यता मिळविली. मजीप्राच्या मदतीने या प्रस्तावाचे महत्त्व आणि गरजही आमदार कडू यांनी संबंधितांना पटवून दिली.

ठळक मुद्देसपन पाणीपुरवठा योजना मार्गी : बच्चू कडू यांच्या प्रयत्नांना यश

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : आठ वर्षांपासून रखडलेली सपन पाणीपुरवठा योजना अखेर आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नांनी मार्गी लागली. प्रक ल्पाची निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.अचलपूर तालुक्यातील सपन प्रकल्पावरील या पाणीपुरवठा योजनेला आमदार बच्चू कडू यांनी ३ आॅगस्ट २०१० रोजी तत्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्याकडून तत्त्वत: मान्यता मिळविली. मजीप्राच्या मदतीने या प्रस्तावाचे महत्त्व आणि गरजही आमदार कडू यांनी संबंधितांना पटवून दिली. या सर्व प्रश्नांचा पाठपुरावा करीत अखेर आ. कडू यांनी ही योजना मार्गी लावून घेतली. सततच्या पाठपुराव्याने मजीप्राचा पूर्ण व्यवहार्यता अहवाल शासनास सादर झाला. ८३ गावांची ही पाणीपुरवठा योजना संकल्पित करताना २०१८ ते २०२८ आणि २०३८ ची संभाव्य लोकसंख्या विचारात घेऊन ३७ हजार ३२ घरांना नळ जोडणीद्वारे दरमहा ११० रुपये प्रतिघर पाणीपट्टी आकारली जाणार आहे. यात अचलपूर तालुक्यातील ४८ व चांदूर बाजार तालुक्यातील ३५ गावांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत सपन प्रकल्पातून गुरुत्वाकर्षण शक्तीने पाणीपुरवठा होणार आहे. योजना २४ तास कार्यान्वित राहण्याकरिता जलशुद्धीकरण केंद्रांना पूर्णवेळ वीज उपलब्ध राहण्यासाठी एक्स्प्रेस फीडरचीही तरतूद आहे.अशी आहे योजना१२ व १६ मीटर उंचीच्या ६४ जलकुंभांतून निघणाऱ्या ३३९.३० किलोमीटर लांबीच्या वितरण व्यवस्थेतून या ८३ गावांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. सपन धरणाच्या कालव्यातून गुरुत्व वाहिनीद्वारे पाणी घेण्याकरिता कॅनॉल इनटेक अरेंजमेंट, कनेक्टिंग मेन आणि स्टिलिंग चेंबरमधून पोलादी पाइप टाकले जाणार आहेत. या ८३ गावांकरिता सपन प्रकल्प जलाशयातून संकल्पित लोकसंख्येसाठी ६.९१७ दलघमी वार्षिक पाणी आरक्षणाची गरज आहे. यापैकी ५.७६६ दलघमी वार्षिक पाणी आरक्षणास मंजुरी आहे.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू