फोटो पी १३ गांजा
अमरावती : नांदगाव खंडेश्वर ठाण्याच्या हद्दीतील शिंगणापूर फाट्यावरून पाच जणांकडून तब्बल ७० किलो गांजा जप्त करण्यात आला. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ११ सप्टेंबर रोजी ही कारवाई केली. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
एलसीबीचे सहायक पोलीस निरिक्षक गोपाल उपाध्याय व त्यांचे पथक ११ सप्टेंबर रोजी नांदगाव खंडेश्वर ठाण्याच्या पेट्रोलींग करीत असता पाच इसम शिंगणापुर फाटा येथे वेगवेगळ्या ऐअरबॅगमध्ये गांजा विक्री करण्याचे उद्देशाने उभे असल्याची माहिती मिळाली. नांदगावचे ठाणेदार हेमंत ठाकरे, गोपाल उपाध्याय व त्यांचे पथक सरकारी पंच, तराजु काट्यावाला, फोटोग्राफर यांच्यासह शिंगणापुर फाटा येथे पोहोचले. तेथे पाचही संशयीत इसमांना ताब्यात घेवुन विचारपुस करण्यात आली. त्यांच्याकडील चार एअर बॅग व एका कापडी पिशवीची झडती घेतली असता त्यांच्या बॅगमध्ये ७ लाख ५ हजार ६७० रुपये किमतीचा ७०.३७५ किलोग्राम गांजा मिळुन आला. पुढील कार्यवाहीकरिता त्यांना नांदगाव खंडेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यांनी केली कार्यवाही
पोलीस अधिक्षक .हरि बालाजी एन. अपर पोलीस अधिक्षक शाम घुगे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाोचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, पो.हे.काॅ.त्र्यंबक मनोहर, सुनील महात्मे, अमोल देशमुख, नापोकाॅ सै.असमत, अमोल केंद्रे, निलेश डांगोरे, पोकाॅ. साैरभ धरमठोक, दिनेश कनोजीया, रोशन चव्हाण, अमोल ढोके, सायबर सेल चे सागर धापड यांनी ही कारवाई केली,