शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; मात्र सोलापुरात देवेंद्र फडणवीसांची एकही सभा नाही!
2
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
3
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
4
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
5
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
6
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
7
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
8
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
9
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
10
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
11
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
12
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
13
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
14
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
17
आधी मलिदा काढला, सत्ता गेल्यावर विरोध सुरू; शिंदेंचा मविआवर घणाघात  
18
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
19
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
20
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."

शहरात वर्षभरात ७० लाखांच्या वीजचोरीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 10:07 PM

शहरातील उपविभाग २ मध्ये महावितरणने वीजचोरीविरूद्ध मोहीन राबविली. यामध्ये वर्षभरात १५१ प्रकरणांत ६९ लक्ष ७२ हजारांची वीजचोरी उघड झाली. यापैकी ६४ ग्राहकांनी ३२ लक्ष ४० हजारांचा दंडासहीत भरणा केला असून उर्वरित प्रकरणांत पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमहावितरणची कारवाई : ३२ लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील उपविभाग २ मध्ये महावितरणने वीजचोरीविरूद्ध मोहीन राबविली. यामध्ये वर्षभरात १५१ प्रकरणांत ६९ लक्ष ७२ हजारांची वीजचोरी उघड झाली. यापैकी ६४ ग्राहकांनी ३२ लक्ष ४० हजारांचा दंडासहीत भरणा केला असून उर्वरित प्रकरणांत पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.अमरावती शहरातील उपविभाग -२ मध्ये कॉटन मार्केट, राजकमल, जवाहर गेट, बुधवारा, कडबी बाजार व भाजीबाजार परिसराचा समावेश आहे. यापैकी भाजीबाजार, कडबी बाजार, बुधवारा या वितरण केंद्रांतर्गत परिसरांत वीजपुरवठा करणाऱ्या भाजीबाजार, लोनटेक, पाटीपुरा, न्यू ताज, महाजनपुरा, ईमामनगर, रोशननगर, चित्रा, ताज व नवसारी या ११ केव्ही विद्युत वाहिन्यांवर ५० टक्क्यांपेक्षा अधिक असलेली वीजहानी महावितरणसाठी चिंताजनक ठरत आहे. त्यामुळे या परिसरातील नियमित वीजबिल भरणाºया ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. या परिसरातील वीज वाहिनीवरील हानी कमी करण्यासाठी कबीरनगर, मांडवा झोपडपट्टी, मसानगंज, गवळीपुरा, पॅराडाईज कॉलनी, हबीबनगर, जमजमनगर, इमली प्लॉट, पठाण चौक, छायानगर, हाजरानगर, उस्माननगर, महाजनपुरा भागातील वीजचोरी रोखण्यासाठी वर्षभरात राबविलेल्या मोहिमेत ६९ लक्ष ७२ हजारांची वीजचोरी उघड झाली. वीजचोरी प्रकराणांमध्ये प्रामुख्याने वीज वाहिनीवर आकोडा टाकणे, डिस्ट्रिीब्युशन बॉक्समधून थेच व भूमिगत केबल टाकून वीजचोरी करणे, सर्विस वायरला टॅपिंग करणे, मीटरमध्ये खोडसाळपणा, असे जिवितास धोका उदभवणारे प्रकार आढळून आले आहेत. त्यामुळे धडक कारवाई दरम्यान ६४ ग्राहकांनी दंडासहीत ३२ लाख ४० रुपये भरले असून, उर्वरित वीजचोरांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.वीजचोरांची जाहीर बदनामी करणारपरिसरात अवैधरीत्या वीजचोरी करणाऱ्यांची नावे महावितरणच्या प्रत्येक वितरण केंद्राच्या दर्शनी भागात लावून त्यांची जाहीर बदनामी करण्यात येणार आहे. वीजचोरांना बाजूच्या घरातून कोणी अनधिकृत वीज देत असेल तर त्यांच्यावरही वीज कायदा २००३ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.प्रामाणिक वीजग्राहकांना सुरळीत सेवा देण्यास महावितरण आग्रही आहे. या वीज वाहिनीवरील वितरण हानी कमी करण्यासाठी व वसुलीसाठी मोहीम तीव्र करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाºयांना दिले आहे.- सुचित्रा गुजर,मुख्य अभियंता, महावितरण कंपनी