शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

७० वर्षांपासून त्यांची अविरत भूतदया

By admin | Published: August 21, 2016 12:11 AM

नजीकच्या राजुरा काळे येथील सधन कास्तकार एम.के.काळे मागील ७० वर्षांपासून चिमण्यांना दाणा-पाणी देण्याचा उपक्रम अविरत राबवीत आहेत.

सेवाभाव : आदर्श घेण्याची गरजचांदूररेल्वे : नजीकच्या राजुरा काळे येथील सधन कास्तकार एम.के.काळे मागील ७० वर्षांपासून चिमण्यांना दाणा-पाणी देण्याचा उपक्रम अविरत राबवीत आहेत. त्यांच्या मातोश्री लंकाबाई कवडुजी काळे यांच्या धार्मिकतेतून त्यांना हे भूतदयेचे धडे मिळाले आहेत. पक्ष्यांना बाजरी, तांदूळ, गव्हाची चुरी त्यांच्या अंगणात पडलेले असते. दिवसातून तीन ते चार वेळा खाद्य टाकले जाते. पक्ष्यांनाही एव्हाना काळे यांच्या या कृतीची सवय झाली आहे. तेदेखील त्यांच्या अंगणात तळ ठोकून असतात. मागील ७० वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम न चुकता सुरू आहे. सधन कास्तकार असलेल्या काळे यांना पशू-पक्ष्यांबद्दल प्रचंड प्रेम आहे. त्यांना जगविण्याची त्यांची तळमळ त्यांच्या कृतीतून दिसून येते. त्यांच्या मातोश्रींचे सन १९९५ साली निधन झाले. पशू-पक्ष्यांसह मूक प्राण्यांवर प्रेम करण्याची शिकवण त्यांनी दिली होती. त्यामुळेच त्यांच्यावर भूतदयेचे संस्कार रूजले आणि त्यांनी हा वारसा पुढे चालविला आहे. सन १९३७ पासून त्यांचा हा उपक्रम सुरू आहे. पक्षी न चुकता काळे यांच्या अंगणात न चुकता हे पक्षी येतात कारण येथे त्यांना खाद्यान्न मिळते. एकीकडे चिमण्या वाचविण्यासाठी मोठे उपक्रम राबविले जातात. विविध घोषणाबाजी केली जाते. या पार्श्वभूमिवर अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबविणारे काळे यांचा खरोखरीच आदर्श घ्यायला हवा. (तालुका प्रतिनिधी)