शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांची व्यवस्था करतो ही कसली भाषा? धनंजय महाडिकांना प्रणिती शिंदेंचा संतप्त सवाल 
2
'आंबेडकर जिंदा हैं तो गोडसे मुर्दा है'; पंतप्रधान मोदींच्या 'एक हैं तो सेफ हैं'वर काय म्हणाले ओवेसी?
3
"पराभूत झाल्या तर मुलांचा सांभाळ करतील, याचा फायदा...", भाजप नेत्याचे RLP खासदाराच्या पत्नीबाबत विधान
4
"खोटं बोल पण रेटून बोल ही महाडिकांची स्टाईल", लाडकी बहीण योजनेच्या वक्तव्यावरुन सतेज पाटलांचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य, १० नोव्हेंबर २०२४ : नोकरीत फायदा होईल, सांसारिक जीवनात सुख-शांती मिळेल
6
सारंगीवादक पंडित राम नारायण यांचे निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
7
फुलंब्रीत प्लास्टिक साहित्य विक्रीच्या दुकानाला आग; तिघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
8
कोणाला पाडायचे, निवडायचे याचे निरोप पोहोचले; जरांगे पाटील यांचा 'लोकमत'च्या मुलाखतीत दावा!
9
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; महिलेसोबत विवस्त्र व्हिडीओ करत १० कोटींची मागितली खंडणी
10
शिवाजी पार्कवर सभेला भाजप, अजित पवार, शिंदेसेनेला परवानगी; पण उद्धव-राज यांना नाही, कारण...
11
मोठी बातमी: वाडा-विक्रमगड मार्गावर ३ कोटी ७० लाख रुपये जप्त
12
मृणाल दुसानिसचं छोट्या पडद्यावर कमबॅक, लवकरच 'या' मालिकेत दिसणार; प्रोमो रिलीज
13
ट्रक-खासगी बसची मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर धडक; आठ जण गंभीर
14
विशेष लेख: ज्या भाषेत बाहेर बोलता तीच भाषा घरी वापरता का..?
15
संकटकाळी ज्यांना मदत, त्यांनीच फाेडला पक्ष; शरद पवारांचा परळीतून धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
16
मुंबईत प्रचाराच्या तोफा अद्याप थंडावलेल्याच; शेवटच्या आठवड्यात मात्र प्रचाराचा पारा चढणार!
17
दोन वर्षांच्या बालिकेची अत्याचार करून हत्या; विकृत सावत्र बापाचे निर्घृण कृत्य
18
हमास-इस्रायल युद्धात गाझाच्या ७० टक्के महिला, मुलांचा बळी गेला; युएनच्या अहवालामुळे खळबळ
19
सत्ता डोक्यात गेलेल्यांचा पराभव करून परळीतील गुंडगिरी संपवा; शरद पवारांचा हल्लाबोल
20
आयसीसीला कळविले! टीम इंडिया चॅम्पिअन ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही; पाकिस्तानींची जिरवली

धक्कादायक...विदर्भात आठ महिन्यांत ७०० शेतकऱ्यांचे बळी

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: September 08, 2024 7:02 PM

दर आठ तासात एक शेतकरी कवटाळतो मृत्यूला

अमरावती : राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या पश्चिम विदर्भात होत आहेत. विदर्भात यंदा आठ महिन्यांत ६९८ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास आवळला आहे. दर आठ तासात एक शेतकरी अस्मानी अन् सुलतानी संकटाचा बळी ठरत असल्याचे दाहक वास्तव आहे.

नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, नापिकी, बँकांचे व सावकारांचे कर्ज, कर्जासाठी तगादा, मुलींचे लग्न, आजारपण यासह अन्य कारणांमुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यामध्ये मराठवाड्यातील शेतकरी सावरला; पण पश्चिम विदर्भातील शेतकरी संघर्षावर मात करीत आहेत. यासाठी शासन-प्रशासनाचे प्रयत्न थिटे असल्याने दरदिवशी तीन शेतकरी अस्मानी-सुलतानी संकटाचे बळी ठरत आहेत.

शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यात सन २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद ठेवली जात आहे. त्यानुसार अमरावती विभागात आतापर्यंत २० हजार ७७२ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यापैकी १० हजार ७६३ प्रकरणे विविध कारणांनी अपात्र, तर ९ हजार ७३५ प्रकरणे पात्र ठरली आहेत. ९ हजार ५३७ प्रकरणांत शासन मदत देण्यात आलेली आहे. अद्याप २७४ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. शासन, प्रशासन शेतकरी आत्महत्यांविषयी गंभीर नसल्याने कोणत्याही ठोस उपाययोजना यामध्ये झाल्या नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.दरदिवशी तीन शेतकऱ्यांची आत्महत्या१) यंदा आठ महिन्यांत ६९८ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक २०४, अमरावती १८०, बुलढाणा १५५, अकोला १०६ व वाशिम जिल्ह्यात ५३ प्रकरणे आहेत.२) यापैकी २१८ प्रकरणे पात्र, २१५ अपात्र, २६५ चौकशीसाठी प्रलंबित आहेत. फक्त ६५ प्रकरणांत शासन मदत देण्यात आलेली आहे. विभागात दर तीन तासात एक शेतकरी आत्महत्या होत आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या