(असायमेंट, फोटो मनीष तसरे) कोरोना संकटकाळात प्रत्येक व्यक्तीने वाहतूक तसेच जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन सर्वच स्तरांतून करण्यात आले होते. मात्र, लॉकडाऊन काळात पाच महिन्यांत ७,४३८ अमरावतीकरांनी वाहतूक नियंमाचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर शहर वाहतूक पोलिसांनी कारवाई करून ७२ लाख ६६ हजार १०० रुपये दंड स्वरूपात वसूल केले.
शहरातील नागरिकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत कोरोना नसल्याप्रमाणे वागल्यामुळे जिल्ह्यावर कोविडची दुसरी भयंकर लाट ओढावली. आता कमी झाली असली तरी लॉकडाऊनच्या काळात पाच महिन्यात वाहतूक पोलिसांनी शहरभर कारवाईचा बडगा उगारला.
आता कोविडच्या संसर्गाला ब्रेक लावण्यासाठी मास्कचा वापर उपयुक्त असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. पण अनेक व्यक्तींनी त्याकडे केल्याने कोरोना शहरात चांगलाच वाढला होता. या काळात वाहतूक पोलिसांनी डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावले. पोलिसांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असताना लोकांना कोरोना होऊ नये, याकरिता विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांची कसून चौकशी केली. दोषींवर कारवाई केली. फेब्रुवारी ते जून दरम्यान शहरात टप्प्याटप्प्याने अनेकदा अमरावतीकरांना लॉकडाऊनचा सामना करावा लागला.
मोबाईलवर बोलणे-२६३७
नो- पार्किंग -४८४०
ट्रिपलसीट - ३२०४
विनालायसन्स-१०१५
फॅन्सी नंबर प्लेट -१३४६
विना मास्क - २३९६
बॉक्स
फॅन्सी नंबर प्लेटची क्रेझ कायम
अमरावतीकरांमध्ये फॅन्सी नंबरची प्लेटची क्रेझ कायम आहे. त्यामुळे शहरात अनेक वाहनांवर फॅन्सी क्रामांक टाकून फिरणाऱ्या तरुणांची संख्या अधिक आहे. पोलिसांनी पाच महिन्यात १,३४६ जणांवर कारवाई करून दंड वसूल केला.
बॉक्स
विना सीटबेल्ट वाहन चालवण्यात मानली जाते धन्यता
शहरात कारचालकाविना सीटबेल्ट वाहन चालविताना आढळून येतात. मात्र, पोलिसांनी विना सीटबेल्ट चालकांवर अल्प प्रमाणात कारवाया केल्या. शहरात हॅल्मेटची सक्ती नाही. त्यामुळे नियम असतानाही पोलीसदेखील हेल्मेट घालत नाहीत. त्यामुळे हेल्मेट न घालणाऱ्यांवर फारशा कारवाई शहर पोलिसांनी केल्या नसल्याचे आकडेवारीतून दिसून येते.
कोट
कोरोनाकाळात वाहतूक पोलिसांच्या टीमने चांगली कामगिरी बजावली. शहरात पाच महिन्यात सात हजार नागरिकांवर कारवाई करून ७३ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. इ-मशीनच्या साह्यानेसुद्धा ऑनलाईन कारवाई व दंड वसूल केला.
- प्रवीण काळे, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा