शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

महापालिकांना ७५ टक्के कचरा विलगीकरणाचे ‘टार्गेट’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2018 8:41 PM

घनकचरा विलगीकरण केल्याशिवाय कच-यास मूल्य प्राप्त होत नाही वा त्यावर प्रकिया करणारे प्रकल्प यशस्वी होत नाहीत, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन महापालिकांना घनकच-याचे विलगीकरण अनिवार्य करण्यात आले आहे.

अमरावती - घनकचरा विलगीकरण केल्याशिवाय कच-यास मूल्य प्राप्त होत नाही वा त्यावर प्रकिया करणारे प्रकल्प यशस्वी होत नाहीत, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन महापालिकांना घनकच-याचे विलगीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. जून २०१८ अखेरपर्यंत ७५ टक्के कचºयाचे विलगीकरण करणे अनिवार्य राहील. राज्यात विविध ठिकाणी पेटलेल्या कचरा प्रश्नाच्या अनुषंगाने या निर्देशांना अत्याधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहरात निर्माण होणाºया कचºयाचे ओला व सुका असे विलगीकरण करण्याची ‘कचरा लाख मोलाचा’ ही मोहीम १ मे २०१७ पासून राबविण्यात आली. मात्र, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी ती मोहीम यशस्वीपणे राबविली नाही. शासनस्तरावरून वारंवार पाठपुरावा करूनदेखील अद्यापही कच-याचे समाधानकारकरीत्या विलगीकरण होताना दिसत नसल्याचे निरीक्षण नगरविकास विभागाने नोंदविले आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता तसेच घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ मधील तरतुदीनुसार, राज्यातील प्रत्येक नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेस तातडीचे निर्देश देण्यात आले आहेत. असे आहेत निर्देशशहरात दररोज निर्माण होणाºया १०० टक्के घनकच-याचे, निर्मितीच्या जागीच ओला व सुका कचरा असे विलगीकरण करणे अपेक्षित आहे. त्यानुसार नगर परिषद व जुन्या नगरपंचायत क्षेत्रामध्ये मे २०१८ अखेरपर्यंत तसेच सर्व महापालिका यामध्ये जून २०१८ अखेरपर्यंत ७५ टक्के कच-याचे विलगीकरण करणे अनिवार्य असेल. वाहतूकही विलगीकृतचशहरात दररोज निर्माण होणाºया १०० टक्के घनकचºयाचे घरोघरी (डोअर टू डोअर) जावून विलगीकृत स्वरूपात संकलन करण्याची कारवाई करण्यात यावी, याशिवाय त्या घनकचºयाची विलगीकृत स्वरूपात वाहतूक करणे अनिवार्य असेल. त्यामुळे वर्तमान परिस्थितीत ओला व सुका कचरा एकत्रितपणे कम्पोस्टवर नेवून टाकला जातो. ती पद्धत बंद करून त्यात सुधारणा करावी लागणार आहे.

टॅग्स :Amravatiअमरावतीnewsबातम्या