शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

जिल्हा परिषद : सेवा प्रवेशोत्तर परीक्षेत ७७ टक्के अधिकारी-कर्मचारी नापास

By जितेंद्र दखने | Published: August 22, 2023 6:50 PM

१२० पैकी ८४ अनुत्तीर्ण, २८ जण उत्तीर्ण

अमरावती : राज्याच्या ग्रामविकास विभागामार्फत दरवर्षी डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सेवा प्रवेशोत्तर परीक्षा घेतली जाते. यंदा ही परीक्षा २५ व २६ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांच्या मार्गदर्शनात राज्यात पहिल्यांदा अमरावतीचा निकाल २१ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला. तो २३.३३ टक्के लागला आहे, तर ७७ टक्के अधिकारी-कर्मचारी अनुत्तीर्ण झाले आहेत.

सेवा प्रवेशोत्तर परीक्षेला जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहायक, वरिष्ठ सहायक, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी शिक्षण, सांख्यिकी, कृषी, आरोग्य याप्रमाणे अधिकारी व कर्मचारी मिळून १२० जणांनी परीक्षा दिली होती. यापैकी केवळ २८ अधिकारी व कर्मचारी उत्तीर्ण झाले, तर ८४ जण अनुत्तीर्ण झाले. परीक्षेला आठ कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. या परीक्षेचा तपशीलवार निकाल विभागीय आयुक्त कार्यालयाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची दरवर्षी डिसेंबर महिन्यात सेवा प्रवेशोत्तर परीक्षा घेतली जाते. यंदा ही परीक्षा गत फेब्रुवारी महिन्यात पार पडली. या परीक्षेचा निकाल राज्यात अमरावती विभागीय आयुक्तांनी पहिल्यांदा जाहीर केला आहे.- पंकज गुल्हाने, राज्य उपाध्यक्ष, जिल्हा परिषद लिपिकवर्गीय संघटना

टॅग्स :Amravatiअमरावतीexamपरीक्षा