शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

७८ गोवंशाचा कंटेनर पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:14 PM

गोवंशाची अवैध वाहतूक करणारा कंटेनर बुधवारी जप्त करण्यात आला. आसेगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या दर्यापूर फाट्याजवळ ही कारवाई करण्यात आली. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने याप्रकरणी चार आरोपींना अटक केली.

ठळक मुद्दे२५ बैल दगावले : चार आरोपींना अटक, ३५ लाखांचा ऐवज जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा/आसेगाव पूर्णा : गोवंशाची अवैध वाहतूक करणारा कंटेनर बुधवारी जप्त करण्यात आला. आसेगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या दर्यापूर फाट्याजवळ ही कारवाई करण्यात आली.ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने याप्रकरणी चार आरोपींना अटक केली. आरोपींकडून मोबाइलसह १५ लाख रुपये किमतीचा कंटेनर, १९ लाख ५० हजार रुपये किमतीचे ७८ बैल व गोऱ्हे असा ३४ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. २५ गोवंशाचा गुदमरल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी अयूब खाँ कुदरत खाँ (५३, रा. मोतीलालनगर, करोद पुलिया, भोपाळ, मध्यप्रदेश), अकबर खाँ बाबू खाँ (३३, रा. बरखेडा कला, ता. आलोट, जि. रतलाम, मध्यप्रदेश), वकील अली अजीज अली (३३, रा. सारंगपूर, जि. राजगढ, मध्यप्रदेश) व माजिद खाँ शफीक खाँ (२६, रा. सारंगपूर, जि. राजगढ, मध्यप्रदेश) या चार आरोपींना अटक करण्यात आली.परतवाडा ते आसेगाव रस्त्याने गोवंशाची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्याने ग्रामीण गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील किनगे यांनी नाकाबंदी केली. नाकाबंदीदरम्यान यूपी २१ सीएन २६४६ या क्रमांकाच्या कंटेनरला पोलिसांनी दर्यापूर फाट्याजवळ थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहनचालकाने वेग वाढविला. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून कंटेनरला पकडले. त्यातील चौघांना विचारणा करण्यात आली.कंटेनरमध्ये ७८ बैल व गोऱ्हे आढळून आले. चारही आरोपींविरुद्ध आसेगाा पूर्णा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला, तर गोवंश रासेगाव स्थित शिवशक्ती गौरक्षण सेवाभावी संस्थेस सुरक्षेच्या दृष्टीने सोपविण्यात आले.जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके, अपर पोलीस अधीक्षक जयंत मिणा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील किनगे, सहायक पोलीस निरीक्षक किरण वानखडे, वासुदेव नागलकर आदीनी ही कारवाई केली. यादरम्यान कंटेनरला एमपी ०९-०१४३ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने पायलटिंग करणारे आरोपी पोलिसांची चाहूल लागताच पळून गेले. त्यांचा शोध सुरू आहे.