शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
3
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
4
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
5
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
6
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
7
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
8
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
10
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
11
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
13
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार
14
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
15
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
16
"जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ" राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला
17
AUS vs IND : किंग कोहलीच्या फॉर्मवर माजी निवडकर्त्यानं मांडल रोखठोक मत
18
नात्याला काळीमा! ८ कोटी न दिल्याने बायकोने काढला नवऱ्याचा काटा; मर्सिडीजने उघड झालं रहस्य
19
वक्फ बोर्डासाठी आयोजित JPC च्या बैठकीत पुन्हा राडा; विरोधकांचा वॉक आऊट
20
ही दोस्ती तुटायची नाय! पराभवानंतर रोहित टीकाकारांच्या निशाण्यावर; धवननं मात्र मन जिंकलं

खरीप पीककर्जाचे ७८ टक्केच वाटप

By admin | Published: September 05, 2015 12:18 AM

जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात असताना पीककर्ज वाटपाचा टक्का अद्याप माघारला आहे.

रुपांतरण ८८ टक्के : सहकारी बँक माघारलीअमरावती : जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात असताना पीककर्ज वाटपाचा टक्का अद्याप माघारला आहे. जिल्ह्यात ३ सप्टेंबरपर्यंत सर्व बँकांनी ७८ टक्के खरिपाचे पीककर्ज वाटप केले आहे. गतवर्षीच्या कर्जाचे ८८ टक्के रुपांतरण झालेले आहे. यामध्ये व्यावसायिक बँकांनी ८४ टक्के पीककर्जाचे वाटप केले असताना जिल्हा सहकारी बँकेने मात्र ६५ टक्केच पीककर्जाचे वाटप केले आहे.जिल्हा बँकेला शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अल्पमुदती कर्जाचे मध्यम कर्जात रुपांतरण केल्यानंतर अशा रुपांतरित कर्जाच्या ६० टक्के रक्कम नाबार्डमार्फत शासनाच्या हमीवर राज्य सहकारी बँकेस फेरकर्ज म्हणून मंजूर करण्याचे धोरण आहे. या अनुषंगाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस रुपांतरणाची १३२ कोटी २९ लाख १५ हजार रुपये नाबार्डच्या ६० टक्के कर्जास शासनाचे व ७ आॅगष्ट रोजी हमी घेतली आहे. जिल्हा बँकेस १९ कोटी ८४ लाख ३७ हजार रुपयांची रक्कम राज्य सहकारी बँकेच्या करारनाम्यानंतर देण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा बँकेस स्वत:च्या १० टक्के हिस्सा देऊन कर्जाचे रुपांतरण झालेल्या शेतकऱ्यांना ३१ आॅगस्टपर्यंत वाटप करण्याचे शासनादेश होते. ३ सप्टेंबरच्या लीड बँक व्यवस्थापकांच्या अहवालानुसार राष्ट्रीयीकृत बँकांनी २० हजार ८०२ शेतकरी खातेदारांच्या २१२ कोटी २२ लाख रुपयांच्या कर्जाचे रुपांतरण केले, ही ९३ टक्केवारी आहे. तसेच १ लाख १४ हजार ९५० शेतकऱ्यांना ११२२ कोटी ९८ लाखांचे पीककर्ज वाटपाचे टार्गेट असतांना १ लाख १३ हजार ६७ शेतकऱ्यांना ९४५ कोटी २१ लाख रुपयांचे कर्जवाटप केले हि टक्केवारी ८४ आहे. या तुलनेत जिल्हा सहकारी बँकेनी १९ हजार ४२२ शेतकऱ्यांना १४० कोटी ५० लाख रुपयांच्या कर्जाचे रुपांतरण केले हि टक्केवारी आहे. ४९ हजार ८२६ शेतकऱ्यांना ३६८ कोटी २२ लाखांचे कर्जवाटप केले, ही ६५ टक्केवारी आहे. या कर्जवाटपात जिल्हा सहकारी बँकेचा टक्का माघारला आहे.जिल्हा बँकेस सहकार आयुक्तांची फटकार जिल्ह्यात दुष्काळ स्थिती असतांना शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेले नाही व पिक कर्जाचे वाटप देखील इतर बँकाच्या तुलनेत कमी असल्याने सहकार विभागाचे प्रधान सचिव शैलेशकुमार शर्मा व सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले व बँकेच्या चौकशी करण्याचे आदेश दिलेत. औरंगाबादचे विभागीय सहनिबंधक चौकशी करुन शासनाला अहवाल सादर करणार आहे.