अमरावती : उपचारादरम्यान बरे वाटल्याने मंगळवारी ७९९ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात संक्रमणमुक्त व्यक्तींची संख्या ५५,३३७ वर पोहोचली आहे. ही टक्केवारी ८८.०२ टक्के आहे.
------------------------
होम आयसोलेशनमध्ये ४,८५० सक्रिय रुग्ण
अमरावती : ज्यांच्याकडे स्वतंत्र रूम व स्वतंत्र प्रसाधनगृह आहे. अशा रुग्णांना होम आयसोलेशनची सुविधा दिली जाते. जिल्ह्यात सद्य:स्थितीत ४८५० रुग्ण या सुविधेचा लाभ घेत आहेत. याशिवाय १,७८९ रुग्ण विविध रुग्णालयांत दाखल आहे.
------------------
शहरात सायंकाळी पावसाच्या सरी
अमरावती : शहरात सायंकाळी ढगाळ वातावरण होऊन पावसाच्या हलक्या सरी आल्या. त्यामुळे अंगाची काहिली करणाऱ्या उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. दोन दिवस असे वातावरण राहणार असल्याचे सांगण्यात आले.
------------------
रुग्ण दुपटीचा कालावधी ११४ दिवसांवर
अमरावती : जिल्ह्यात सध्या रुग्णसंख्या वाढीला असल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी ११४ दिवसांवर पोहोचला असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. यामुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे.