शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
4
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
6
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
7
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
8
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
9
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
10
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
11
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
12
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
13
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
14
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
15
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
16
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
17
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
18
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
19
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
20
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!

पश्चिम विदर्भातील दुष्काळी २८ तालुक्यांना ८०० कोटींचा मदतनिधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 11:11 AM

यंदाच्या हंगामात दुष्काळाचा दुसरा 'ट्रिगर' लागलेल्या पश्चिम विदर्भातील २८ तालुक्यांत ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या सहा लाख ७२ हजार ६६३ हेक्टरला ‘एनडीआरएफ’ची ८०० कोटी ४१ लाखांची मदत मिळणार आहे.

ठळक मुद्दे३१७६ गावांमध्ये ७.८७ लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कगजानन मोहोडअमरावती : यंदाच्या हंगामात दुष्काळाचा दुसरा 'ट्रिगर' लागलेल्या पश्चिम विदर्भातील २८ तालुक्यांत ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या सहा लाख ७२ हजार ६६३ हेक्टरला ‘एनडीआरएफ’ची ८०० कोटी ४१ लाखांची मदत मिळणार आहे. आतापर्यंत ४७४ कोटी ३६ लाखांची मदत वितरित करण्यात आली, तर २२ फेब्रुवारीला तिसऱ्या टप्प्याचे ३२६ कोटी पाचही जिल्ह्यांना वितरित करण्यात आले. सद्यस्थितीत सहा लाख ८९ हजार ७२८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ३४६ कोटी ९७ लाखांचा मदतनिधी जमा करण्यात आलेला आहे.दुष्काळ व्यवस्थापन संहिता-२०१६ च्या निकषानुसार विभागातील २८ तालुक्यांत दुष्काळाचा दुसरा 'ट्रिगर' लागल्याने शासनाने ३१ आॅक्टोबर २०१८ ला २८ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता. याच तालुक्यांना २५ जानेवारीला दुष्काळनिधीची मदत जाहीर केली. या सर्व तालुक्यांत पीक कापणी प्रयोगानंतर कृषी विभागाद्वारा सत्यापन करण्यात आले होते. त्यानुसार या सर्व तालुक्यांत ६,७२,६६३ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याने केंद्रीय आपदा निधीमधून ही मदत देण्यात येत आहे.कृषी विभागाच्या सत्यापनानुसार अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात ४२,९८८ हेक्टर, चिखलदरा २२,९७६, मोर्शी ५८८४९, वरूड ४९४१४, अंजनगाव सुर्जी ४१६९५, अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यात ४७३१, अकोला ३६४, तेल्हारा ५४५९, बाळापूर ६२९६, बार्सी टाकळी २३११ यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ तालुक्यात ६२.२९, बाभुळगाव ५९.९९, कळंब ८६.८६, राळेगाव ७८.८९, मारेगाव ९१.७७, केळापूर १३८.२३, दारव्हा ६४.७७, महागाव ७५.२२ व उमरखेड तालुक्यात ८०.४ हेक्टर बुलडाणा जिल्ह्यात मोताळा तालुक्यात ५८७१४ हेक्टर, मलकापूर ४२३५७, खामगाव ७५३७०, शेगाव ४६७५३, नांदूरा ५०१०४, संग्रामपूर ४२७१४, लोणार ५२४२४, व सिंदखेडराजा ६४१०१ तसेच वाशिम जिल्ह्यात रिसोड तालुक्यात ४३०३.१९ हेक्टरसाठी ही मदत आहे.कमी पैसेवारीच्या ४७९१ गावांना डावललेदुष्काळाच्या नव्या संहितेनुसार शासनाने ३१ आॅक्टोबरला विभागातील २८ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला. यामध्ये २००७ गावांत दुष्काळ स्थिती शासनाने जाहीर केली व आता एनडीआरएफचा मदतनिधी देखील वितरित केला. महसूल विभागाने ३१ डिसेंबरला खरिपाची अंतिम पैसेवारी जाहीर केली. यामध्ये जाहीर दुष्काळी गावे वगळता ४७९१ गावात ५० पेक्षा कमी पैसेवारी आहे. मात्र, या गावांना मदतनिधीत डावलण्यात आले, तर दुष्काळासंदर्भातील फक्त आठ सवलतींवर या गावांची बोळवण करण्यात आलेली आहे.असा मिळाला जिल्हानिहाय निधीअमरावती जिल्ह्यात ७३८ गावांतील १४९८५७ श्ेतकऱ्यांसाठी १८६ कोटी ३६ लाख, अकोला जिल्ह्यात ६२३ गावांतील १४९६१८ शेतकऱ्यांसाठी १३७ कोटी ६१ लाख, बुलडाणा जिल्ह्यातील ५९९ गावांतील १९८००६ शेतकऱ्यांसाठी १९९ कोटी ६५ लाख, यवतमाळ जिल्ह्यात १११६ गावांतील २३४४१८ श्ेतकऱ्यांसाठी २३२ कोटी ६७ लाख व वाशिम जिल्ह्यात १०० गावांतील ५५११५ श्ेतकऱ्यांसाठी ४४ कोटी १० लाखांचा निधी आतापर्यंत वितरित करण्यात आलेला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी