११४ कोटी मंजूर : लवकरच विकासात्मक कामांना सुरुवात होणारअमरावती : शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत ११४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून जून-जुलैमध्ये जीवन प्राधिकरणला ८३ कोटी रुपये मिळाले आहे. या कामांच्या ई-निविदा काढण्यात आल्या आहे. विकासात्मक कामांना लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत भामरे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. यामध्ये तपोवनजवळील ६१ दशलक्ष लीटर प्रतिदिन हा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच अमरावती व बडनेरा मध्ये विविध ठिकाणी ११ जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. तसेच शहरात ५५० कि .मी. नवीन व जुन्या वितरण नलिकेची कामे करण्यात येणार आहेत. तसेच सिंभोरा धरण व तपोवनमध्ये पंपींग मशिन लावण्यात येणार आहे. त्यामुळे अमरावती शहरात करण्यात येत असलेला पाणीपुरवठा अधिक चांगला होण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत शहरातील विविध कामांसाठी ११४ कोटी रुपये मंजूर झाले असून ८३ कोटींचा निधी मिळाला आहे. या कामांच्या निविदा काढण्यात आल्याअसून लवकरच कामे सुरू होणार आहे. प्रशांत भामरे, कार्यकारी अभियंता, जीवन प्राधिकरण विभाग
शहरात अमृत योजनेंतर्गत ८३ कोटींची कामे
By admin | Published: November 08, 2016 12:13 AM