आॅनलाईन लोकमतअमरावती : सिंभोरा येथून अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवर तांत्रिक दोष असलेले एअर व्हॉल्व्ह बसविले आहेत. ८७ एअर व्हॉल्व्हकरिता ८३ लाख रुपये खर्च केल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. त्याच्याच परिणामी महिन्याभरात चार ते पाच वेळा दोन-तीन दिवसांकरिता पाणीपुरवठा बंद ठेवण्याची नामुष्की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर ओढवली आहे.राज्यात अन्य शहरांकरिता मॉडेल ठरलेल्या अमरावती पाणीपुरवठा योजनेला मजीप्रा अधिकाऱ्यांनी ग्रहण लावले आहे. पाणीपुरवठा योजना ही नव्याने अमृत अभियानांतर्गत राबविली जात आहे. २०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर टॅम्परप्रूफ ११२ एअर व्हॉल्व्ह बसविण्यासंदर्भात २०१६ मध्ये निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. नाशिक येथील कंत्राटदार पी.एल. आडके यांनी ८७ एअर व्हॉल्व्ह बसविले. मात्र, तरीदेखील मुख्य जलवाहिनी एअर लॉक होत असल्याचा अहवाल मजीप्राच्या उपविभागीय अभियंत्यांनी वरिष्ठांना १५ जानेवारी २०१७ रोजी दिलेला आहे. परंतु, मजीप्राच्या वरिष्ठांनी एअर व्हॉल्व्हचा पुरवठा करताना ‘पाणी’ मुरविल्याने या महत्त्वपूर्ण तांत्रिक बाबीकडे दुर्लक्ष चालविले.एअर तपासणीतून खुलासासातत्याने जलवाहिनीला लीकेजची समस्या मजीप्राने गाभीर्याने घेतली नाही. यापूर्वी १५०० मिमी पी.एस.सी. गुरुत्ववाहिनीवर बसविलेल्या एअर व्हॉल्व्ह क्र. ५९ ची तांत्रिक तपासणी करण्यात आली. मात्र, पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर एअर व्हॉल्व्हमधून पास होणारी एअरची तपासणी केली असता, एअर व्हॉल्व्ह लॉक झाल्याचे दिसून आले. ही तपासणी नाशिक येथील मयूर कंपनीचे तंत्रज्ञ सुमीत सिंग यांच्यासह मजीप्राचे उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता हजर होते. ८३ लाखांचे बोगस एअर व्हॉल्व्ह पुरवठा करून ते गुरुत्ववाहिनीवर बसविले असताना, ही बाब मजीप्राच्या अधिकाºयांनी दडवून ठेवली, हे विशेषएअर लॉकमुळे जलवाहिनीला लीकेजगत चार महिन्यांपासून मजीप्राच्या मुख्य जलवाहिनीला एअर लॉकच्या फटक्याने लीकेज होत आहे. परिणामी अमरावती शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत आहे. सतत मुख्य जलवाहिनीला लीकेज होण्यास एअर लॉक कारणीभूत ठरले आहे.नागरिकांना मनस्तापसलग चार महिन्यांपासूनसतत पाणीपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आता तर दिवसाआड पाणीपुरवठ्याने अमरावतीकर हैराण झाले आहेत. काही भागात नवीन जलवाहिनी टाकली जात असून, होत असलेल्या खोदकामाने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.मजीप्राचा पर्दाफाश होईल विधिमंडळातमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक दोष असलेले एअर व्हॉल्व्ह खरेदी करून नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवले. ही बाब अत्यंत गंभीर असून, मजीप्राचा पर्दाफाश येत्या उन्हाळी अधिवेशनात केला जाईल, असे आ. सुनील देशमुख ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले. त्यांनी गुरुवारी मजीप्रात घेतलेली आढावा बैठक याच मुद्द्यावर गाजली होती.जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्हबाबत अहवाल मागविला आहे. यात काही त्रुटी राहिल्या तर नाही, हेदेखील तपासले जाईल. एअर व्हॉल्व्हमध्ये किरकोळ समस्या असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.- एस.एस. चारथळ, अधीक्षक अभियंता, मजीप्रा
८३ लाखांचे बोगस एअर व्हॉल्व्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 11:49 PM
आॅनलाईन लोकमतअमरावती : सिंभोरा येथून अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवर तांत्रिक दोष असलेले एअर व्हॉल्व्ह बसविले आहेत. ८७ एअर व्हॉल्व्हकरिता ८३ लाख रुपये खर्च केल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. त्याच्याच परिणामी महिन्याभरात चार ते पाच वेळा दोन-तीन दिवसांकरिता पाणीपुरवठा बंद ठेवण्याची नामुष्की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर ओढवली आहे.राज्यात अन्य शहरांकरिता मॉडेल ...
ठळक मुद्देमजीप्रात पाणी मुरतेय : महानगरात पाणीपुरवठ्याचे तीनतेरा