अमरावती : जिल्हा परिषदेला पंधराव्या वित्त आयोगाचा २०२०-२१ च्या दुसऱ्या हप्त्यातील बंधित अनुदान (टाईड ग्रँड) ४५ कोटी २५ लाख ५० हजार रुपये प्राप्त झाले आहेत. पंचायत समितीमार्फत ग्रामपंचायतनिहाय वितरणाचा तपशील प्राप्त होताच पंचायत विभागाकडून हे अनुदान ग्रामपंचायतींच्या राष्ट्रीयीकृत बँकेतील खात्यावर जमा केले जाणार आहे.
जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ८४० ग्रामपंचायतींना ३६ कोटी २० लाख ४० हजार रुपये, जिल्हा परिषदेला ४ कोटी ५२ लाख ५५ हजार, तर पंचायत समितीला ४ कोटी ५२ लाख ५५ हजार रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या २०२०-२१ बेसिक ग्रँडचा पहिला हप्ता ४५ कोटी २५ लाख ५० हजार रुपयांमधून ८० टक्के याप्रमाणे ८४० ग्रामपंचायतींना ३६ कोटी २० लाख ४० हजार रुपये यापूर्वी दिले आहेत. त्यामुळे सगळ्याच योजनांच्या मिळणाऱ्या निधीवर परिणाम झाल्याने वित्त विभागाच्या अनुदानावर ग्रामपंचायतींच्या विकासकामांची भिस्त आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानातून ८० टक्के निधी ग्रामपंचायतींना, तर प्रत्येकी दहा टक्के निधी पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर ठेवण्यात येतो. पंधराव्या वित्त आयोगातून मिळालेल्या अनुदानामुळे कोरोनाकाळात ग्रामपंचायतींना दिलासा मिळणार आहे.
बॉक्स
असे आहे अनुदान वाटप
तालुका ग्रामपंचायती अनुदान रक्कम
अमरावती ५९ २८५३५०६६
भातकुली ४८ २०८३९६६४
नांदगाव खं ६८ २३८९८६५८
चांदूर रेल्वे ४९ १६१६८७३४
धामनगांव रे ६२ २२४२४४९१
तिवसा ४५ १८६८७८८४
मोशी ६७ २९९५३०९६
वरूड ६६ ३०३७०८५०
चांदूर बाजार ६६ ३४१८०८५०
अचलपूर ७१ ३३१९९७११
अंजनगाव सुर्जी ४९ २०७८६०९३
दर्यापूर ७४ २८०९३४४८
धारणी ६२ ३३३४३५९१
चिखलदरा ५५ २१५५७८६४
कोट
पंधराव्या वित्त आयोगाचा दुसरा हप्ता नुकताच प्राप्त झाला आहे. सदर निधी नियमाप्रमाणे सीईओंच्या मार्गदर्शनानुसार ग्रामपंचायतींना वितरित करण्याची कार्यवाही केली जात आहे.
- दिलीप मानकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)