संजय खासबागे - वरुडवरुड तालुक्यात यंदा दरवर्षीच्या तुलनेत अत्यल्प पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे येत्या उन्हाळ्यात तालुक्यात भीषण पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता असल्याचे सिंचन विभागाने म्हटले आहे. तालुक्यात ९ प्रकल्प असून यावर्षी पावसाळ्यात १०० टक्के ेजलसाठा संचयित झाला होता. परंतु आॅगष्टनंतरच पावसाने दडी मारल्याने जानेवारीपर्यंत वाहणाऱ्या नद्यांचा प्रवाहसुध्दा खंडित झाला आहे. पाणी वापर संस्थांनी पिकांना पाणी सोडण्यासाठी मागणी केली आहे. नोव्हेंबरमध्ये सिंचन प्रकल्पात केवळ ८५ टक्के जलसाठा होता. शेकदरी प्रकल्प व पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेकदरी प्रकल्पाची पूर्ण जलसंचय क्षमता ५१४.६५ मीटर आहे. ओलीत क्षमता १ हजार ३४० हेक्टर, पुसली प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचय क्षमता १००.६० मीटर असून ओलीत क्षमता ३०९ हेक्टर, वाई प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता ४६१.७७ मीटर आहे. ओलीत क्षमता ३७० हेक्टरची आहे. सातनूर प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचय क्षमता ५००.७५ मीटर तर ओलीत क्षमता २९९ हेक्टर, पंढरी प्रकल्पात जल संचय क्षमता ४४८.३० मीटर तर ओलीत क्षमता १५३ हेक्टर, जामगांव प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचय क्षमता ४८०.५० मीटर आहे. ओलीत क्षमता १२१ हेक्टर, नागठाणा प्रकल्पात जल संचय क्षमता ४८१.६० मीटर आहे. ओलीत क्षमता २१२ हेक्टर ,जमालपूर प्रकल्पाची ओलीत क्षमता १२२ हेक्टर ,बेलसावंगी प्रकल्पात १०४.१० मिटर जलसाठा असून ओलीत क्षमता १२१ हेक्टरची आहे. लोणी धवलगिरी प्रकल्पाची ओलीत क्षमता ६३६ हेक्टरची आहे आहे तर वघाळ बंधारा असून ओलीत क्षमता ४९६ हेक्टर आहे. परंतु यंदा झालेल्या अत्यल्प पावसाळ्यामुळे प्रकल्प उन्हाळ्याच्या दिवसांत कोरडे पडण्याची दाट शक्यता सध्याच्या परिस्थितीवरुन दिसून येत आहे. त्यामुळे पाणीटंचाई जाणवेल.
सिंचन प्रकल्पात ८५ टक्के जलसाठा
By admin | Published: November 19, 2014 10:32 PM