लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बहुप्रतीक्षेनंतर माध्यमिक शालांत परीक्षा १० वीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यात अमरावती विभागातून १७४८१० इतक्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १७४०४८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १४६८०२ इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ८४.३५ आहे.यात अकोला जिल्ह्यात ४४१ शाळांमध्ये २८४१३ इतक्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून २३८७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ८४.०२ इतकी आहे. यात ११९९६ मुले तर ११८७८ मुलींचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यात ६७० शाळांमधून ४३५११ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून ३७०४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ८५.१५ इतकी आहे. यात १८८२६ मुले तर १८२२२ मुली आहेत. बुलडाणा जिल्ह्यातून ४९९ शाळांमधून ४०६५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून ३५९७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ही टक्केवारी ८८.४९ इतकी आहे. यात १९७४७ मुले तर १६२२५ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात ६२२ शाळांमधून ४०६५६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून ३१७२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. ७८.०३ इतकी टक्केवारी ठरली आहे. यात १६२९३ मुले तर १५४२९ मुली आहेत. वाशिम जिल्ह्यात २९२ शाळांमधून २०८१६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १८१८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ही टक्केवारी ८७.३७ इतकीआहे. यात मुले १००९४ तर ८०९२ मुली आहेत.
अमरावती जिल्ह्याचा ८५.१५ टक्के निकाल
By admin | Published: June 14, 2017 12:04 AM