शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
4
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
5
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
6
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
8
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
9
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
10
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
11
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
12
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
13
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
14
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
15
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
16
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
17
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
18
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
19
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
20
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न

राज्यातील ८७ आरएफओ बनणार एसीएफ, खुल्या प्रवर्गात पदोन्नती, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधिनस्थ कार्यवाही  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 8:16 PM

राज्याच्या वनविभागातील ८७ वनपरिक्षेत्राधिका-यांना (आरएफओ) सहायक वनसंरक्षक (एसीएफ) पदी पदोन्नती मिळणार आहे. त्याअनुषंगाने नागपूर येथील वन भवनात  मंगळवारी वरिष्ठ वनाधिका-यांची डीपीसी पार पडली. ही पदोन्नती शासन निर्णयानुसार खुल्या संवर्गासाठी लागू राहील, ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे.

अमरावती - राज्याच्या वनविभागातील ८७ वनपरिक्षेत्राधिका-यांना (आरएफओ) सहायक वनसंरक्षक (एसीएफ) पदी पदोन्नती मिळणार आहे. त्याअनुषंगाने नागपूर येथील वन भवनात  मंगळवारी वरिष्ठ वनाधिका-यांची डीपीसी पार पडली. ही पदोन्नती शासन निर्णयानुसार खुल्या संवर्गासाठी लागू राहील, ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे.             ११ प्रादेशिक वनविभाग, ६ सामाजिक वनिकरण, ६ व्याघ्र प्रकल्प, ६ कायर् आयोजना, १ संशोधन विभाग, ६ शिक्षण व संशोधनाच्या माध्यमातून राज्यात वनविभागाचा डोलारा सांभाळला जातो. आरएफओंची १२०० पदे मंजूर असतानाही २५० पेक्षा अधिक पदे आजही रिक्त आहेत. त्यामुळे आरएफओंना बढती मिळावी, यासाठी अपर प्रधान मुख्यवनसंरक्षक (कार्मिक) सुनील लिमये यांच्या पुढाकाराने पदोन्नती समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला राज्याचे प्रधान मुख्यवनसंरक्षक श्रीभगवान, अपर प्रधान मुख्यवनसंरक्षक (प्रशासन) डॉ. ए.आर. मंडे, सुनील लिमये, नितीन काडोडकर, अतुल कोदे आदी उपस्थित होते.‘आरएफओ टू एसीएफ’ पदोन्नती देण्यासंदर्भात १२५ वनपरिक्षेत्राधिकाºयांच्या यादीवर मंथन झाले. यात राज्यातील आरएफओंना खुल्या प्रवर्गात पदोन्नती देताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधिनस्थ राहून पदोन्नती देण्याचे ठरविण्यात आले. पदोन्नती देताना आरक्षण नव्हे, तर कर्तव्य गृहीत धरले. त्यामुळे आरएफओंना एसीएफपदी बढती मिळताना सेवेचा कार्यकाळ महत्त्वाचा ठरला. ८७ आरएफओंना बढती देण्याबाबत प्राथमिक स्तरावर निर्णय झाला असून यात काही नावे वाढण्याचे असे संकेत आहे. विभागीय चौकशी, तक्रारी, निलंबन आदी प्रकरणातील आरएफओ आपसुकच पदोन्नतीतून बाजूला ठेवले जातील, अशी माहिती आहे.

‘‘ नियमानुसारच आरएफओंना एसीएफपदी पदोन्नती देण्याबाबतचा निर्णय झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश या पदोन्नतीसाठी लागू असेल. भविष्यात काही फेरबदलाचे आदेश मिळाल्यास तशी कार्यवाही केली जाईल.- सुनील लिमये,एपीसीसीएफ (कार्मिक) वनविभाग, नागपूर

‘फॉरेस्टर टू आरएफओ’ डीपीसी के व्हा?वनपरिक्षेत्राधिका-यांना सहायक वनसंरक्षकपदी बढती देण्याबाबत निर्णय झाला आहे. मात्र, ‘फॉरेस्टर टू आरएफओ’ असे पदोन्नती देण्यासाठी वरिष्ठ वनाधिका-यांची डीपीसी केव्हा घेणार, असा सवाल पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या वनपालांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभागAmravatiअमरावती