टक्का माघारला : उद्दिष्टांच्या ५० टक्क्यांवर स्थिरावल्या बँकागजानन मोहोड अमरावतीयंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्हा सहकारी बँकेसोबत राष्ट्रीयीकृत बँकांना १७५९ कोटी ४५ लाख ७६ हजार रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना सद्यस्थितीत ८८४ कोटी ७९ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. खरीप हंगामाला सुरुवात झाली असताना अद्याप ८७४ कोटी ६६ लाख ७६ हजार रुपयांचे कर्जवाटप बाकी आहे. कर्जवाटपाची ही टक्केवारी ५० एवढी आहे. कर्जवाटपासाठी शासनाने ३० जून ही ‘डेडलाईन’ दिली आहे.सलग तीन वर्षांपासून दुष्काळ, नापिकी व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आहेत. बी-बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकरी बँकाचे उंबरठे झिजवीत आहेत. बँकांकडून मात्र शेतकऱ्यांची पीककर्जाची अडवणूक होत आहे. शासनाचा पीककर्जवाटपासाठी प्रचंड दबाव असतानादेखील बँकांनी पीककर्ज वाटपाची कुर्मगती सोडलेली नाही. पीक कर्जवाटपासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ३० जून अंतिम मुदत दिली असताना कर्जवाटपाचा टक्का निम्म्यावर रखडला आहे. जिल्ह्यातील ७१ हजार २२९ शेतकऱ्यांचे ६४३ कोटी ३० लाख रुपयांचे कर्ज पुनर्गठनासाठी पात्र असताना १६ जूनपर्यंत ३९ हजार ६५ शेतकऱ्यांचे २९१ कोटी ६१ लाख रुपयांच्या कर्जाचे पुनर्गठन बँकांनी केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यंदाच्या खरीप हंगामासाठी ५७१ कोटी ३३ लाख ५० हजारांचे उद्दिष्ट दिलेले असताना १६ जूनपर्यंत ३७ हजार ५८५ शेतकऱ्यांना ७४ हजार ४८९ हेक्टर क्षेत्रासाठी ३१२ कोटी २ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आलेले आहे. ही टक्केवारी ५४ एवढी आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना ११७८ कोटी २८ लाख २६ हजारांच्या पीककर्ज वाटपाचे लक्ष्य देण्यात आले असताना आतापर्यंत ५६७ कोटी ६१ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आलेले आहे. याची टक्केवारी ४८ एवढी आहे. ग्रामीण बँकांना ९ कोटी ८४ लाख रुपयांचे उद्दिष्ट असताना सद्यस्थितीत ५ कोटी १६ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आलेले आहे. याची टक्केवारी ४३ एवढी आहे. सद्यस्थितीत या सर्व बँकांनी ८८४ कोटी ७९ लाख रुपयांचे कर्जवाटप केले असले तरी ८७४ कोटी ६६ लाख ७६ हजारांचे कर्जवाटप बाकी आहे. ३० जूनपर्यंत कर्जवाटपाचे निर्देशजिल्ह्यातील शेतकरी सततचा दुष्काळ, नापिकी व नैसर्गिक आपत्ती यामुळे चिंतेत आहे. त्यांना तातडीने कर्जपुरवठा केल्यास खरीप हंगामासाठी उपयोगी पडणार आहे. यासाठी सर्व बँकांनी शाखानिहाय कर्ज मेळावे घेऊन ३० जूनपर्यंत कर्जवाटप पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बँका माघारल्यायंदाच्या खरीप हंगामासाठी राष्ट्रीयीकृत बँकांना ११७८ कोटी २८ लाख रुपयांचे उद्दिष्ट दिले असताना या बँकांनी ६३ हजार २७ शेतकऱ्यांना ५६ हजार ७६१ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. याची टकेवारी ४८ एवढी आहे. अद्याप या बँकांद्वारा ६१० कोटी ६७ लाखांचे कर्जवाटप बाकी आहे. ते पूर्ण करण्याची प्रतीक्षा लागली आहे.असे झाले कर्जवाटपसद्यस्थितीत अलाहाबाद बँकेने ९ कोटी ८ लाख, आंध्रा बँकेनी १८ लाख, बँक आॅफ बडोदा ५ कोटी, बँक आॅफ इंडिया १४ कोटी १६ लाख, बँक आॅफ महाराष्ट्र १३३ कोटी ८० लाख, कॅनरा बँक ७५ लाख, सेंट्रल बँक १४२ कोटी १५ लाख, कार्पोरेशन बँक १ कोटी ८८ लाख, देना बँक १९ कोटी, इंडियन बँक ५ कोटी, आयडीबीआय बँक ४ कोटी ६७ लाख, इंडियन ओव्हरसीज बँक ५ कोटी २६ लाख, पंजाब बँक २ कोटी ७० लाख, स्टेट बँक आॅफ हैद्राबाद ११ लाख, स्टेट बँक आॅफ इंडिया १९२ कोटी ३७ लाख, सिंडीकेट २० लाख, ईको २ कोटी ६२ लाख, युनियन बँक १६ कोटी ३५ लाख, विजया बँक ६ लाख, अॅक्सीस बँक १ कोटी ८ लाख, एचडीएफसी बँक ६ कोटी ३० लाख, आयसीआयसीआय ७ कोटी ५७ लाख रुपये कर्जवाटप १६ जूनपर्यंत केले.
८७५ कोटी कर्जवाटप बाकी
By admin | Published: June 19, 2016 12:05 AM