लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हांतर्गत आॅनलाइन बदली प्रक्रियेत चुकीची माहिती भरून बदलीचा लाभ घेणाºया विभागातील ९५८ शिक्षकांची विभागीय आयुक्तांनी सुनावणी सुरू केली आहे. १९ जुलैपासून सुरू झालेल्या या सुनावणी प्रक्रियेत जिल्हाभरातील ३४० शिक्षकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी पहिल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत १४० शिक्षकांची विभागीय उपायुक्तांसमोर सुनावणी घेण्यात आली आहे.जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या २०१८ मध्ये झालेल्या बदलीसंदर्भात अन्यायग्रस्त शिक्षकांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रारी केल्या होत्या. २३ मे ते ७ जुलै या कालावधीत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे विभागातील पाच जिल्ह्यांतून ९५८ तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी शिक्षक बदली संदर्भातील तक्रारींची गंभीर दखल घेत पाचही जिल्ह्यातील शिक्षकांची सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला. विभागीय आयुक्तांनी अमरावती जिल्ह्यातील ३४०, अकोला ८८, यवतमाळ १४०, बुलडाणा ३७८, वाशिममधील एकूण विभागाची ९५८ पडताळणी करण्याबाबत तक्रार असलेल्या शिक्षकांची सुनावणीची प्रक्रिया सुरू केली आहे. १९ ते २१ जुलै दरम्यान तक्रारप्राप्त शिक्षकांची सुनावणी घेण्यात येत आहे. यात अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत ३४० शिक्षकांसंदर्भात तक्रारी आहेत. यापैकी १३० शिक्षकांची विभागीय उपायुक्त गजेंद्र बावने यांनी सुनावणी घेतली आहे.जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आर.डी. तुरणकर, उपशिक्षणाधिकारी वामन बोलके आदींच्या उपस्थितीत आॅनलाइन बदलीप्रकियेत चुकीची माहिती भरणाºया शिक्षकांच्या दस्तावेजांची पडताळणी केली जात असून, संबंधिताचे म्हणने जाणून घेतले जात आहे. या शिक्षकांच्या सुनावणीची प्रक्रिया आटोपल्यानंतर दोषी आढळून येणाऱ्या शिक्षकांवर काय कारवाई होते, याकडे शिक्षण विभागातील सर्वांचे लक्ष लागले आहे.विभागीय आयुक्त कार्यालयात गर्दीजिल्हांतर्गत आॅनलाइन बदली प्रक्रियेत चुकीची माहिती व खोट्या प्रमाणपत्रावर बदलीचा लाभ घेणाºया शिक्षकांसंदर्भात विभागातील पाचही जिल्ह्यांतून ९५८ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार सुनावणीसाठी विभागातून आलेल्या शिक्षकांची मोठी गर्दी विभागीय आयुक्त कार्यालयात दिसून आली. यामुळे या विभागाला यात्रेचे स्वरूप आले होते.
९५८ शिक्षकांची विभागीय उपायुक्ताकडे सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 1:35 AM
जिल्हांतर्गत आॅनलाइन बदली प्रक्रियेत चुकीची माहिती भरून बदलीचा लाभ घेणाºया विभागातील ९५८ शिक्षकांची विभागीय आयुक्तांनी सुनावणी सुरू केली आहे. १९ जुलैपासून सुरू झालेल्या या सुनावणी प्रक्रियेत जिल्हाभरातील ३४० शिक्षकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
ठळक मुद्देचुकीची माहिती भरणाऱ्यांची पेशी : जिल्ह्यातील ३४० जणांचा समावेश