गजानन मोहोड अमरावतीजमिनीचा कस पाहून पिके घेतली तर उत्पादनक्षमता वाढविता येऊ शकते. मात्र जिल्ह्यातील शेतकरी जमिनीच्या आरोग्य तपासणीत निरूत्साही असल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांपैकी केवळ ३७०० शेतकऱ्यांनी वर्षभऱ्यात माती व पाणी परिक्षण केले आहे हे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी आहे.माती परीक्षण केल्याने जमिनीतील नत्राचे प्रमाण लक्षात येते. परीक्षणासाठी कृषी विद्यापीठ व भूजल परीक्षण विभागाने ठरवून दिलेल्या प्रमाणात आणि शेतकऱ्यांनी परीक्षणासाठी आणलेल्या मातीमध्ये कमी-जास्त प्रमाण लक्षात कृषी विभागाद्वारा नत्र, स्फूरद, पलाश, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक आदी घटकांचे प्रमाण ठरवून दिले जाते. त्यामुळे जमिनीचा कस वाढून पीक उत्पादनात वाढ करता येते. हे परीक्षण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. मात्र शेतकरी पारंपरिक शेती पद्धतीवरच भर देत आहे. केवळ ठिबक सिंचनाचे अनुदान मिळण्याकरिता हे परीक्षण बंधनकारक आहे. किंबहुना अनेक शेतकऱ्यांचे माती परीक्षण ठिबक कंपन्याच करून आणतात व अनुदानासाठी परस्परच परीक्षणाचा अहवाल जोडतात.वास्तविकता माती परीक्षणाशिवाय पारंपरिक पद्धतीने शेती करणे कठीण झाले आहे. माती-पाणी परीक्षण गरजेचे आहे.
९९ टक्के शेतकऱ्यांचा माती परीक्षणाला ‘खो’
By admin | Published: February 07, 2015 12:05 AM