शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
2
टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
3
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
4
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
5
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
6
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
7
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
8
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
9
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
10
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
11
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
12
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
13
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
14
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
15
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
16
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
17
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
18
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
19
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
20
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी

झेडपीत ९९ अनुकंपाधारकांना मिळाली नोकरी

By जितेंद्र दखने | Published: February 09, 2024 9:51 PM

गट ‘क’ आणि ‘ड’ मध्ये पदस्थापना : समुपदेशनाने निवड प्रक्रिया

अमरावती: जिल्हा परिषदेच्या विविध विभागात कार्यरत असताना आई, वडील किंवा पतीचे अनुकंपा तत्त्वावर वारसाला नोकरी दिली जाते. त्यानुसार झेडपीतील एकूण रिक्त पदाच्या २० टक्के जागावर शुक्रवारी जिल्हा परिषदेतील गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील विविध पदावर निवड करण्यात आली आहे.जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा यांच्या अध्यक्षतेखाली तर सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओ डॉ. कैलास घोडके यांच्या उपस्थितीत अनुकंपा तत्त्वावरील रिक्त असलेल्या पदासाठीची भरती प्रक्रिया ९ फेब्रुवारी रोजी डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

या भरती प्रक्रियेसाठी पात्र असलेल्या जिल्हाभरातील एकूण ९९ उमेदवारांना बोलविण्यात आले होते. त्यानुसार अनुकंपावर नियुक्तीसाठी संबंधित उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार दस्तऐवजांचे पडताळणीनंतर पात्र असलेल्या ९९ उमेदवारांना जिल्हा परिषदेतील विविध विभागातील रिक्त असलेल्या पदावर समुपदेशन पद्धतीने निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये स्थापत्य अभियंता सहायक, कनिष्ठ सहायक लेखा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक पुरुष, वरिष्ठ सहायक लिपीक, विस्तार अधिकारी सांख्यिकी, अंगणवाडी पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता बांधकाम, कनिष्ठ अभियंता पाणीपुरवठा, परिचर आदी पदावर सामावून घेण्यात आले आहे.

या प्रक्रियेसाठी सहायक प्रशासन अधिकारी नीलेश तालन, कनिष्ठ प्रशासन अधिकारी पंकज गुल्हाने, कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्रीकांत मेश्राम, कनिष्ठ प्रशासन गजानन कोरडे, कनिष्ठ सहायक राहुल रायबोले, निशांत तायडे, सुजीत गावंडे, सतीश पवार, समक्ष चांदुरे, राजू गाडे आदींनी अनुकंपा भरतीसाठी सहकार्य केले. जिल्हा परिषदेत अनुकंपावर विविध पदावर निवड झालेल्या उमेदवारांना लवकरच नियुक्ती आदेश दिले जाणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओ डॉ. कैलास घोडके यांनी सांगितले.

अशा मिळाल्या अनुकंपावर नियुक्त्यास्थापत्य अभियंता सहायक-०८,कनिष्ठ सहायक लेखा-०१,प्रयोग शाळा तंत्रज्ञ-१,आरोग्य सेवक पुरुष-१९,वरिष्ठ सहायक लिपिक-०२,विस्तार अधिकारी सांख्यिकी-०२,अंगणवाडी पर्यवेक्षक-०२,औषध निर्माण अधिकारी-०२,कंत्राटी ग्रामसेवक-१८,कनिष्ठ अभियंता बांधकाम-०१,कनिष्ठ अभियंता पाणीपुरवठा-०४ या प्रमाणे नियुक्त्या दिल्या आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषदAmravatiअमरावती